
कर्जाची, व्याजाची रक्कम लिलावासाठी नोटीस काढण्याआधी न भरल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची पत्नी नीलिमा नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश नारायण राणे यांचे नाव PNB Housing Finance Limited ने नोटीसीत दिले आहे. दोघांनी ठाणे जिल्ह्यात असलेल्या अंबरनाथमधील घराचं कर्ज थकवलं असल्यानं PNB हाऊसिंग फायनान्सने निलेश राणेंना दणका दिला आहे. पैसै न दिल्यानं बँकेनं कर्ज थकवलेल्या कर्जदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात निलेश राणे आणि नीलिमा राणे यांचीही नावे आहेत.
अंबरनाथमध्ये असलेल्या जोवेली गावातील त्यांची मालमत्तेवर असलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यानं पीएनबी बँकेनं त्यांना नोटीस बजावली आहे. निलेश राणे आणि नीलमताई राणे यांनी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे १८ लाख 14 हजार 80 रुपये आणि 82 पैसे थकवले आहेत. तसंच कर्जाची, व्याजाची रक्कम लिलावासाठी नोटीस काढण्याआधी न भरल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.
बँकेनं म्हटलं आहे की, कर्जाचे हप्ते तसंच व्याज न भरल्यानं आरबीआयच्या नियमानुसार खात्याचे नॉन परफॉर्मिंग अॅसेट म्हणून वर्गीकरण केलं आहे. तुम्ही मुद्दल रकमेचा हप्ता, व्याज वेळेवर दिला नसल्याचं दिसून येतं. नोटीस बजावल्यापासून ६० दिवसांच्या आत व्याज आणि थकीत कर्जाची रक्कम भरावी असंही सांगण्यात आलं आहे. या मालमत्तेची विक्री किंवा भाड्याने हस्तांतर करता येणार नाही असेही नोटीसीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.