

Nepal Flood News
ESakal
ठाणे : नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका ठाणे जिल्ह्यातील नऊ पर्यटकांना बसला आहे. यामध्ये ठाणे शहरातील पाच, कल्याण-डोंबिवलीतील तीन आणि नवी मुंबईतील एका पर्यटकाचा समावेश आहे. बुधवारी रात्री ८.१५ वाजल्यानंतर त्यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.