मुंबईत ओमिक्रॉन’चे ९५ टक्के रुग्ण; १९० नमुन्यांचा जिनोम अहवाल जाहीर

Omicron patients
Omicron patientssakal media

मुंबई : कोविड १९ विषाणूच्या (corona infection) जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंगचा नवव्या तुकडीचा अहवाल जाहिर झाला आहे. मुंबईतील १९० रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा (corona virus samples) अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘ओमिक्रॉन’ चे ९४.७४ टक्के रुग्ण (omicron patients) आढळले आहेत.

Omicron patients
नवी मुंबई: ऑनलाईन वाईन मागविणे पडले महागात; तरुणीला ६५ हजारांचा गंडा

या १९० पैकी २३ रुग्णांचा मृत्यू ओढवला. पैकी २१ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे व सहव्याधीग्रस्त होते. एवढेच नव्हे तर या २३ पैकी १५ जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता. त्यामुळे कोविड लसीकरण आवश्यक असल्याची बाब पुन्हा स्पष्ट झाली आहे. नवव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २८२ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील १९० रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत.

० ते २० वर्षे वयोगट  - १७ रुग्ण (९ टक्के) 

२१ ते ४० वर्षे वयोगट - ३६ रुग्ण (१९ टक्के)

४१ ते ६० वर्षे वयोगट - ४१ रूग्ण (२२ टक्के)

६१ ते ८० वयोगट - ७४ रुग्ण (३९ टक्के)

८१ ते १०० वयोगट - २२ रुग्ण (१२ टक्के)

कोविड विषाणू उपप्रकारानुसार या १९० बाधित ओमायक्रॉन - १८० रुग्ण (९४.७४ टक्के)

•डेल्टा व्हेरिअंट - ३ रुग्ण (१.५८ टक्के)

•डेल्टा – १ रुग्ण (०.५३ टक्के)

•इतर - ६ रुग्ण (३.१६ टक्के)

Omicron patients
पनवेल ‘झोपडपट्टीमुक्त’ होणार; तब्बल चार हजार रहिवाशांना हक्काचे घर मिळणार

या १९० पैकी वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये १३ जण मोडतात. पैकी, ११ जणांना ओमिक्रॉनची बाधा

एका जणास डेल्टा डेरिव्हेटीव्हची बाधा

•एका जणास इतर उप प्रकाराची लागण

१९० पैकी १०६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पैकी,

•पहिला डोस घेतलेले ५ जण रुग्णालयात दाखल.

•दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ५० जण रुग्णालयात दाखल.

•लसीचा एकही डोस न घेतलेले ५१ जण रुग्णालयात दाखल.

•रुग्णालयात दाखल १०६ पैकी फक्त ९ जणांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. तर ११ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली.

एकूण १९० संकलित नमुन्यांपैकी २३ नमुने मृत रुग्णांशी संबंधीत संकलित केले आहेत. पैकी, मृत रुग्णांमध्ये ६० ते ८० या वयोगटातील १३, तर ८१ ते १०० या वयोगटातील ८ अशा एकूण २१ नागरिकांचा समावेश आहे. प्रामुख्याने ते सहव्याधीग्रस्त देखील होते.

•मृतांपैकी १५ जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता.

•२३ पैकी २१ नागरिकांना ओमायक्रॉन, तर इतर दोघांना अन्य उप प्रकाराची लागण झाली होती.

•लक्षणे आढळल्याच्या सातव्या दिवसानंतर २२ जणांचा तर सात दिवसांच्या आत एकाचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com