नवी मुंबई: ऑनलाईन वाईन मागविणे पडले महागात; तरुणीला ६५ हजारांचा गंडा

Wine
WineSakal media

नवी मुंबई : खारघर सेक्टर-५ मध्ये राहणाऱ्या तरुणीला (२६) ऑनलाईन मद्य (Online liquor) मागविणे चांगलेच महागात पडले आहे. मद्य मागविण्यासाठी ज्या मोबाईलवर संपर्क साधला, त्या मोबाईलधारकाने गुगल पेद्वारे (Google pay) रजिस्ट्रेशन करण्याच्या बहाण्याने तरुणीला ६५ हजारांचा गंडा (Money fraud) घातला. खारघर पोलिसांनी (Kharghar police) या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Wine
प्राण्यांसोबत फोटो, टॅटू, ग्रूमिंग अन्‌ बरंच काही...

तरुणी खारघर सेक्टर-५ मध्ये कुटुंबासह राहते. १० फेब्रुवारी रोजी रात्री तिने ऑनलाईन मद्य मागविण्यासाठी गुगलवरून पायना वाईन्सचा मोबाईल क्रमांक शोधला. त्यावर संपर्क साधून मद्याची ऑर्डर दिल्‍यावर झालेले बिल १४०० रुपये आलेल्‍या क्‍युआर कोडवर पाठवले. त्यानंतर एकाने अर्ध्या तासांत ऑर्डर घेऊन येत असल्याचे तरुणीला कळविले होते. त्‍यानंतर पुन्हा तरुणीशी संपर्क साधून रजिस्ट्रेशनच्या बहाण्याने गुगल पे ॲप सुरू करण्यास सांगितले.

त्‍यानंतर १८,३७३ इतकी रक्‍कम टाकण्यास तसेच युपीआय पीन टाकण्यास सांगितले. त्यामुळे तिच्या खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यात वळती झाली. अशा प्रकारे तरुणीची दिशाभूल करून ६५ हजारांची रक्‍कम उकळली. फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच तरुणीने खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com