esakal | नीरज गुंडे, भाजप सेना मध्यस्थीचे बॅक चॅनेल ?
sakal

बोलून बातमी शोधा

नीरज गुंडे, भाजप सेना मध्यस्थीचे बॅक चॅनेल ?

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील ताण दूर करणारे किंवा निर्वाणीचे निरोप मध्यस्थ नीरज गुंडे यांनीच पोहोचवले काय अशी विचारणा राजकीय वर्तुळात केली जाते आहे.

नीरज गुंडे, भाजप सेना मध्यस्थीचे बॅक चॅनेल ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील ताण दूर करणारे किंवा निर्वाणीचे निरोप मध्यस्थ नीरज गुंडे यांनीच पोहोचवले काय अशी विचारणा राजकीय वर्तुळात केली जाते आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राउत पुन: पुन्हा भाजपवर बोलत राहिले तर 'तो' पक्ष नाराज होईल असा निर्वाणीचा इशारा मातोश्रीवर एका बॅक चॅनेलच्या माध्यमातून पोहोचवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेले प्रेम राउतांच्या विधानामुळे संशयग्रस्त होवू शकते असे कळवले गेले होते.

आणखी वाचाका केला मोदींनी शरद पवारांना फोन ? 

संजय राऊत म्हणतात, 'महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार'

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी काही भूमिका मांडली ती आम्ही पाळणार आहोत. जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत यावर बोलता येत नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार आहोत. इतकी ताकद शिवसेनेत आहे, असेही ते म्हणाले.

आणखी वाचाउपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतून 'या' नेत्याचं नाव चर्चेत..

भाजपने गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, शिवसेना-भाजपची युती राज्यात आहे. युती होण्यापूर्वी ज्या काही गोष्टी झाल्या त्यानुसार महायुतीचे सरकार स्थापन व्हावे. आम्हीही त्यासाठी तयारीत आहोत. शिवसेनेत खूप मोठी ताकद आहे. महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणं आमचं काम आहे. शिवसेनेचा कोणताही निर्णय पक्षप्रमुखांशिवाय होत नाही. व्यक्ती महत्त्वाची नसून, राज्य आणि सरकार महत्त्वाचे आहे.

WebTitle :  niranj gunde back channel on shivsena and BJP talks