उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतून 'या' नेत्याचं नाव चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 October 2019

भाजप शिवसेनेत सत्तावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळतेय. अशातच भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. यात एकनाथ शिंदे याचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी समोर येत असल्याची चर्चा आहे.

मुंबई : भाजप शिवसेनेत सत्तावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळतेय. अशातच भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. यात एकनाथ शिंदे याचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी समोर येत असल्याची चर्चा आहे. 

का केला मोदींनी शरद पवारांना फोन ? 

आदित्य ठाकरे यांनी कोणतंही मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद घेऊ नये, सुरवातीला हे पद एकनाथ शिंदे किंवा सुभाष देसाई यांना दिलं जावं असाही एक मतप्रवाह आहे. याचसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी अलीकडे मंत्री झालेले तानाजी सावंत यांचं देखील नाव चर्चेत आहे.  

आदित्य ठाकरेंना ताबडतोड उपमुख्यमंत्री करण्याऐवजी त्यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाऊ शकते अशी देखील माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येतेय. 

शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच ; आजपासून फुटणार राजकीय फटाके

कोणती खाती शिवसेनेकडे येऊ शकतात ?

शिवसेना मुख्यमंत्रीपदासह महत्त्वाच्या खात्यांसाठी देखील आग्रही आहे.  गृह, वित्त, महसूल किंवा नगरविकास या चार खात्यांपैकी काही खाती आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. दरम्यान, निवडून आलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपने 26 खाती स्वत:कडे ठेवणार आहे. तर सेनेला 13 आणि मित्रपक्षांना 4 खाती देऊ केली आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय. 

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार -सूत्रांची माहिती

Webtitle : senior shivsena leader eknath shinde might get deputy CM post


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior shivsena leader eknath shinde might get deputy CM post