esakal | आईवर रुसलेल्या लेकीची निर्भया पथकाने केली सुरक्षित घरवापसी | Nirbhaya cell
sakal

बोलून बातमी शोधा

crying girl

आईवर रुसलेल्या लेकीची निर्भया पथकाने केली सुरक्षित घरवापसी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मानखुर्द : आईवर रुसून घराबाहेर पडलेली (House left) अल्पवयीन मुलगी (Minor) निर्भया पथकामुळे (Nirbhaya cell) सुखरूप घरी परतल्याची घटना टिळकनगर पोलीस ठाण्याच्या (tilak nagar police) हद्दीत घडली. पोलिसांच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला.
टिळकनगर पोलिस ठाण्याचे निर्भया पथक शुक्रवारी (ता.८) रात्री दीडच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी पी. एल. लोखंडे मार्गावरील नारायण गुरू हायस्कूललगतच्या पालिका उद्यानात (BMC Garden) अल्पवयीन मुलगी रडताना दिसली.

हेही वाचा: गरबा बंदीमुळे कलाकारांवर संक्रांत; कोरोनामुळे हतबल, दिवाळी कशी करणार?

निर्भया पथकाने चौकशी केली असता, आईवर रुसून घरातून निघून आल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिची समजूत काढण्यात आली व आईला बोलावून तिच्या ताब्यात देण्यात आले. उपनिरीक्षक सीमा बाबर यांच्या नेतृत्वात निर्भया पथक टिळकनगर पोलिस ठाणे परिसरात गस्त घालत होते. अभ्यास, घरकाम करण्यावरून, तसेच मोबाईलमध्ये व्यग्र असण्यावरून तिची आई रागावते. त्यामुळे आईवर रुसून ती घर सोडून आल्याचे तिने सांगितले.

loading image
go to top