

Mumbai Coastal Road Gardens
ESakal
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी मुंबईसाठी एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कंपनी मुंबईतील १३० एकरच्या "कोस्टल रोड गार्डन्स" प्रकल्पावर वेगाने काम करत आहे. नीता अंबानी म्हणाल्या की, हे उद्यान लंडनच्या हाइड पार्क आणि न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर तयार केले जाईल.