

Nitesh Rane: वारंवार प्रक्षोभक विधान करुन चर्चेत राहणारे राज्याचे मत्स आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नव्यानं केलेल्या एका विधानामुळं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे, त्यामुळं कोणाला चिंता करण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे नागपूर दंगल प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं नितेश राणे हे पुन्हा चर्चेत आले आहेत.