Indrajeet Sawant: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज फेटाळला. यानंतर सावंत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोपी कोरटकरला एक आवाहन केलं आहे. त्यामुळं आता कोरटकरची अटक कशा पद्धतीनं होते हे पाहावं लागणार आहे.