
Mumbai Candela Boat
ESakal
मुंबई : मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार आहे. प्रसिद्ध स्वीडिश तंत्रज्ञान कंपनी कॅंडेलाच्या अत्याधुनिक बोटी लवकरच मुंबईच्या पाण्यात धावताना दिसतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबईचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असेल, असे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.