नितीन देसाईंच्या संस्थेशी कौशल्य प्रशिक्षण करार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई - युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगार कौशल्य देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी आर्ट वर्ल्ड या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. 

या करारानुसार चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळ्या संधींच्या अनुषंगाने युवक-युवतींना नितीन देसाई प्रशिक्षण देतील. चित्रपट उद्योगातील कारागिरांना प्रशिक्षण देणे व त्यांच्यातील कौशल्याचा विकास करणे या उद्देशाने हे करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तीन वर्षांत सहा हजार तरुण-तरुणींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. 

प्रशिक्षणाचा खर्च कौशल्य विकास विभाग आणि देसाई यांची कंपनी करणार आहे. चित्रपट एडिटिंग, कलामांडणी, स्टेज बांधणी याबाबतचे प्रशिक्षण या कार्यक्रमातून दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर किमान 75 टक्के तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे. कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत आतापर्यंत असे 29 सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

Web Title: Nitin Desai's organization skills training agreement