मुंबईतील तुंबणाऱ्या पाण्याबाबत नितिन गडकरींंची आयडीया; मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सल्ला

तुषार सोनवणे
Wednesday, 14 October 2020

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे.

मुंबई - मुंबईत दरवर्षी होत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे नेहमीच जनजिवन विस्कळीत होत असते. महानगरपालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात परंतु निसर्गासमोर त्या तोकड्या ठरतात. यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपाय सुचवला आहे. त्यासंबधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवले आहे.

EXCLUSIVE : सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेहाल; जेवणासह राहण्याची सोय नाही; एसटीच्या आवारात झोपूनच काढताहेत रात्र

दरवर्षी मुंबईत धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे, शहरातील जनजीवन ठप्प होत असते. चाकरमान्याचे हाल होतात. त्यात काहीजणांचे जीव देखील गमावावे लागले आहेत. मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनची वाहतूकही बंद होते. यावर केद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एक उपाय सुचवला आहे. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. 

  • या पत्रातील काही मुद्दे
  •  मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करणे
  • तुंबणाऱ्या पाण्याचा वापर शेती आणि उद्योगासाठी शक्य
  • तुंबणारे पाणी शुद्धीकरण करून धरणात साठवता येऊ शकते.
  • प्रक्रिया करून धरणात साठवलेलेल पाणी ठाणे, नाशिक, नगर अशा जिल्ह्यांकडे वळवणे

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचे महत्व अधिक आहे. मुंबईच्या पाणी समस्येबाबत आपण सर्वोतोपरी मदत करू असेही गडकरी यांनी म्हटले आहे. त्यासोबतच मुंबईच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबतही त्यांनी या पत्रात उपाययोजना नमुद केल्या असल्याची माहिती मिळतेय. या पत्राची एक प्रत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसनेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनाही पाठविण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkaris idea about flooding in Mumbai Advice by letter to the Chief Minister