असा ओळखा रिक्षाच्या मीटरमधील झोल; नितीन नांदगावकरांनी दिला डेमो

असा ओळखा रिक्षाच्या मीटरमधील झोल; नितीन नांदगावकरांनी दिला डेमो

मुंबई : 'नितीन नांदगावकर', नाम तो सुना हि होगा.. होय हे तेच नितीन नांदगावकर आहेत ज्यांनी गेल्या काळात टॅक्सीचालक आपलं मीटर फास्ट करून प्रवाशांची कशाप्रकारे लुट करतात हे आपल्याला दाखवलं होतं. टॅक्सी चालकांपाठोपाठ आता रिक्षा चालकांनीही मीटरमध्ये छेडछाड करून पैसे कमावण्याचा गोरख धंदा सुरू केलाय. त्यामुळे शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी या फसवणुकीचा भांडाफोड केलाय.

मंडळी तुम्ही आजवर रिक्षाचालकांच्या मुजोरीचे अनेक किस्से ऐकले असतील, प्रत्यक्ष त्याचा अनुभवही घेतला असेल. त्यात आता भर पडलीय ती फसवणुकीची. सामाजिक कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनीच या गोरख धंद्याचा भांडाफोड केलाय. पाहा रिक्षाचालक ग्राहकांची कशी फसवणूक करतायेत. 

रिक्षा सुरु असताना एक डॉट हा मीटरवर ब्लिंक होताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र रिक्षा थांबली असताना जर हा डॉट, जर हा बिंदू ब्लिंक होत असेल तरमात्र मीटर फास्ट करण्यासाठी काहीतरी यंत्रणा बसवली आहे हे नक्की. यापुढे तुम्ही रिक्षातून प्रवास करताना या गोष्टी बारकाईने पाहा. रिक्षात आधी असा डॉट दिसतोय का हे पाहा, त्यानंतर रिक्षावाल्याला रिक्षा थांबवायला सांगा. जर थांबलेल्या रिक्षेत देखील हा डॉट ब्लिंक होत असेल तर मात्र गडबड आहे असं समजा. रिक्षाचालक सामान्य ग्राहकांची कशी फसवणूक करतायेत हे यावरून लक्षात येतं.

त्यामुळे तुम्ही रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करतेवेळी वेळीच सावध व्हा. अशा रिक्षाचालकांची तक्रार तात्काळ पोलिसांकडे करा. 

WebTitle : nitin nandgaonkar showing how to chk if your auto meter is running fast 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com