Women Empowermentsakal
मुंबई
Women Empowerment : नीतू जोशी आणि मिआम ट्रस्टचा आदिवासी महिलांसाठी पुढाकार!
Tribal Women Welfare : नीतू जोशी आणि मिआम ट्रस्ट यांच्या पुढाकारातून गडचिरोलीतील आदिवासी महिलांमध्ये आत्मभान आणि नेतृत्व विकसित होत आहे. शिक्षण, सशक्तीकरण व सामाजिक सन्मानाचा मार्ग खुला होत आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या आदिवासी पट्ट्यात, एक शांत पण प्रभावी क्रांती घडत आहे — समाजसेविका नीतू जोशी आणि त्यांच्या मिआम चॅरिटेबल ट्रस्टच्या समर्पित टीममुळे हे शक्य होत आहे. आदिवासी महिलांचे, विशेषतः एकट्या मातांचे आणि दारूच्या व्यसनामुळे उपेक्षित झालेल्या महिलांचे जीवन उन्नत करण्यासाठी त्यांनी एक भक्कम सामाजिक आंदोलन उभं केलं आहे.