एनएमएमटीचे वाणिज्य संकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत

एनएमएमटीचे वाणिज्य संकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत
एनएमएमटीचे वाणिज्य संकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत

नवी मुंबई : वाशी डेपोत वाणिज्य संकुल उभारून ती जागा भाड्याने देऊन एनएमएमटीचा तोटा कमी करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी १७० कोटी रुपयांची निविदा मंजूर केली असून, हे काम अश्विनी इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा.लि.यांना देण्यात आले आहे; मात्र पर्यावरण विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत एनएमएमटीचे हे वाणिज्य संकुल अडकले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या संकुलाचे भूमिपूजन करण्याचे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

नवी मुंबई महापालिकेचा एनएमएमटी उपक्रम तोट्यात असून, हा तोटा कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून निरनिराळ्या उपाययोजना अमलात आणण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग एसटीच्या धर्तीवर उपलब्ध असलेल्या बसस्थानकावर वाणिज्य संकुले उभारून ते भाड्याने देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. वाशी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या १०,३७३ चौ.मी.च्या भूखंडावर २१ मजली वाणिज्य संकुल उभारण्यात येणार आहे. हा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. 

या इमारतीत तयार केली जाणारी दुकाने विकून या वाणिज्य संकुलाच्या बांधकामाचा खर्च भागवण्यात येणार आहे. तूर्तास हा प्रकल्प पर्यावरण विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पर्यावरण विभागाच्या पुढील बैठकीची तारीख निश्‍चित झाल्यानंतर एनएमएमटीच्या या वाणिज्य संकुलाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर या इमारतीच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

वाणिज्य संकुलात तळमजल्यावर दुकाने बांधण्यात येणार असून, वरील चार मजले पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ४४८ वाहनांचे पार्किंग करण्यात येणार असून, त्यावरील मोकळी जागा हॉटेलसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. हरित वास्तूसाठी ज्या तरतुदी आहेत, त्या सर्व तरतुदींचा अंतर्भाव या इमारतीच्या बांधकामात करण्यात येणार आहे. याशिवाय इमारतीच्या तळमजल्यावर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा छोटा एसटीपी (सीवरेज ट्रीटमेंट फ्लांट) उभारण्यात येणार आहे.
- शिरीष आरदवाड, महाव्यवस्थापक, एनएमएमटी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com