'एपीएमसी'तील कामगारांसाठी एनएमएमटी सेवा सुरू, 'या' मार्गावर धावणार 'बस'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

लॉकडाऊनच्या काळात वाहतूकीसाठी पर्याय नसल्यामुळे कल्याण-डोंबिवली भागात राहणारा एपीएमसीतील कामगार घरातच अडकून पडला होता.

नवी मुंबई : कल्याण-डोंबिवली भागात राहणाऱ्या एपीएमसीतील विविध कामगारांसाठी अखेर एनएमएमटी प्रशासनाने बस वाहतूक सुरू केली आहे. आजपासून दहा बस सुरू केल्या आहेत. बेलापूरच्या भाजप आमदार मंंदा म्हात्रे यांनी ही बससेवा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि एनएमएमटी व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

महत्वाची बातमी Coronavirus : रुग्णवाहिकेबाबत नवी मुंबई महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय, रुग्णांची हेळसांड थांबणार?

लॉकडाऊनच्या काळात वाहतूकीसाठी पर्याय नसल्यामुळे कल्याण-डोंबिवली भागात राहणारा एपीएमसीतील कामगार घरातच अडकून पडला होता. कामावर येत नसतानाही एपीएमसीतील काही व्यापाऱ्यांनी कामगारांना घरी बसून वेतन आणि अन्न-धान्य पुरवले; परंतु एका मर्यादेनंतर व्यापारी वर्गाला ही मदत करणे शक्य नसल्याने कामगारांना कामावर बोलवणे गरजेचे होते; मात्र कामगारांना ये-जा करण्यासाठी वाहतुकीचे साधन नसल्याने व्यापारी संघटनांनी मदतीसाठी मंदा म्हात्रे यांची भेट घेतली. या भेटीत म्हात्रे यांनी वाहतुकीचे पर्याय म्हणून एनएमएमटी सुरू करून देण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले. त्यानुसार म्हात्रे यांनी अण्णासाहेब मिसाळ यांच्यासोबत चर्चा करून त्या मार्गावर एनएमएमटी बससेवा सुरू करण्याचा विकल्प मांडला.

नक्की वाचा : आदित्य ठाकरेंनी करुन दाखवलं, कोरोनाचा 'हा' हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेनं 

मिसाळ यांनी म्हात्रे यांना तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत बस सुरू करण्याचे आदेश एनएमएमटी प्रशासनाला दिले. त्यानुसार आजपासून कल्याण-डोंबिवली ते वाशी या मार्गावर कामगारांसाठी दहा बस सुरू करण्यात आल्या आहेत. एका बसमध्ये 22 प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एनएमएमटीचे नुकसान होत असल्यामुळे तिकीट दर 80 रुपयांऐवजी 140 रुपये करण्यात आले आहे.

महत्वाची बातमी : मुंबईत या पाच स्थानकांहून टॅक्सी सेवा सुरु, अशी करा टॅक्सी बुक

एपीएमसी मार्केट सुरू झाल्यानंतरही फक्त वाहतुकीचे साधन नसल्यामुळे एपीएमसीतील 400 कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. सर्वांचे कुटुंब अडचणीत सापडले होते. ही अडचण लक्षात घेत बससेवा सुरू केल्याबद्दल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचे आभार. तसेच सर्व कामगार नियमांचे काटेकोरपणे पालन करतील.
- मंदा म्हात्रे, भाजप, आमदार

NMMT service for APMC workers, buses to run on this route


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMMT service for APMC workers, buses to run on this route