मुंबईत या पाच स्थानकांहून टॅक्सी सेवा सुरु, अशी करा टॅक्सी बुक

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जून 2020

मुंबईत टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी अंशतः मंजुरी दिली आहे. पण त्यात केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध असणार आहे.

 

मुंबई- आजपासून लॉकडाऊन 5.0 ला सुरुवात झाली आहे. अशातच मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही सेवा थोड्याप्रमाणात शिथिल केल्यात आहेत. त्यातच मुंबईत टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी अंशतः मंजुरी दिली आहे. पण त्यात केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध असणार आहे. प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि घर या दरम्यान प्रवास करण्यासाठीच ही टॅक्सी सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच बऱ्याचदा टॅक्सीची वाट बघत ताटकळत उभं राहावं लागत. हे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून टॅक्सी बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईतल्या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचा स्तुत्य निर्णय... बाप्पाचे आगमन होणार पण...

रेल्वे स्टेशन आणि घर असाच असेल प्रवास 

टॅक्सीच्या माध्यमातून घर ते रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानक ते घर या टप्प्यांसाठी ही टॅक्सी सेवा असणार आहे. देशभरात आजपासून काही रेल्वे धावणार आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून मुंबईत आलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी आणि ट्रेन पकडण्यासाठी घरातून स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे. अत्यावश्यक कारणांसाठी राज्य सरकारने टॅक्सीला मान्यता दिली आहे.

आदित्य ठाकरेंनी करुन दाखवलं, कोरोनाचा 'हा' हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेनं 

टॅक्सीची शोधाशोध टाळण्यासाठी स्थानकावरच मुंबई टॅक्सी मेन्स संघटनेचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आलेत. ज्या प्रवाशांना टॅक्सी बुकिंग करायची आहे, अशा प्रवाशांनी कॉल करुन अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करुन प्रवास करता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना स्थानकात पोहचण्यापूर्वी किंवा घरातून निघण्यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकांवरील टॅक्सी प्रतिनिधी क्रमांक

सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, दादर- चंदू नायर 9821640498

लोकमान्य टिळक टर्मिनस- फरीद 7977774884, शशी दुबे 9833080800, तुपे 9082888380

वांद्रे टर्मिनस- देवाडिगा 9029885937, कोटीयन 7977927009

मुंबई टॅक्सी संघटना प्रतिनिधी- शाम खानविलकर 8369545457, 8655551562


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taxi service starts from these five stations in Mumbai, book a taxi