एनएमएमटीला आर्थिक हातभार लावावा!

एनएमएमटीला आर्थिक हातभार लावावा!
एनएमएमटीला आर्थिक हातभार लावावा!

नवी मुंबई : एनएमएमटीचा वाढता तोटा कमी करण्यासाठी आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सिडको, एमआयडीसी व पनवेल महापालिकेला केले आहे. या तिन्ही प्राधिकरणांनी दरमहा एनएमएमटीच्या तोट्याची प्रतिपूर्ती केल्यास त्यांच्या क्षेत्रात उत्तम बस सेवा पुरविण्याचे काम प्रशासनाला करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

नवी मुंबई महापालिका क्षेत्रासह सिडको, पनवेल महापालिका व एमआयडीसी क्षेत्रातील नागरिकांसाठी सक्षम बस सेवा पुरविण्याचे काम नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामार्फत (एनएमएमटी) सुरू आहे. ही सेवा पुरविताना दिवसागणिक तोटा सहन करावा लागत असल्यामुळे एनएमएमटीचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या अनुदानावर तग धरून असलेल्या एनएमएमटीची चाके सतत धावती ठेवायची असल्यास सिडको, एमआयडीसी व पनवेल महापालिकेनेदेखील एनएमएमटी उपक्रमाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सिडको, पनवेल महापालिका आणि एमआयडीसीच्या व्यवस्थापनाकडे पत्राद्वारे केली आहे. 

साडेचार कोटींचा तोटा
सिडको, पनवेल महापालिका आणि एमआयडीसी कार्यक्षेत्रात देण्यात येत असलेल्या बस सेवेद्वारे एनएमएमटीला जवळपास ४ कोटी ५० लाख इतका मासिक तोटा सहन करावा लागत आहे. यामध्ये सिडको क्षेत्रात १ कोटी ५९ लाख, पनवेल महापालिका क्षेत्रात २ कोटी ५ लाख व एमआयडीसी क्षेत्रात दरमहा ८५ लाख रुपये तोटा एनएमएमटीला सहन करावा लागत आहे.

एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून प्रतिमाह अनुदान देण्यात येते. त्याच धर्तीवर सिडको कार्यक्षेत्र, पनवेल महापालिका आणि एमआयडीसी यांनीही परिवहन उपक्रमास दरमहा अनुदान द्यावे. जेणेकरून एनएमएमटीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. परिणामी, या क्षेत्रातील प्रवाशांना अधिक क्षमतेने बस सेवा उपलब्ध करून देणे शक्‍य होईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com