एनएमएमटीतील कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दणका!

एनएमएमटीतील कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दणका!
एनएमएमटीतील कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दणका!

मुंबई : तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामचुकार कर्मचाऱ्यांना घरी पाठवा आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांना बक्षीस लागू करा, अशा सूचना आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एनएमएमटी व्यवस्थापकांना दिल्या. महापालिकेच्या कामाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अण्णासाहेब मिसाळ यांनी गुरुवारी (ता. १) एनएमएमटी व्यवस्थापनाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. 

मिसाळ यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे एनएमएमटीचे व्यवस्थापन आता कामाला लागले असून, कामचुकार कर्मचाऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. 
बदलते इंधन दर, देखभाल-दुरुस्ती, सवलतींच्या विविध योजना, इतर पर्यायी वाहतूक व्यवस्थांची स्पर्धा आदी बाबींमुळे महापालिकेच्या एनएमएमटीला दर दिवसाला तब्बल १८ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालवल्या जात असलेल्या या परिवहन उपक्रमाला आत्तापर्यंत तोटा कमी करता आलेला नाही. त्यामुळे दर महिन्याला महापालिकेला एनएमएमटी प्रशासनाला अनुदान द्यावे लागते. एनएमएमटी व्यवस्थापनामध्ये ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या दीड हजार कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे आयुक्त मिसाळ यांना प्रकर्षाने जाणवले. अशा कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून घरी बसवण्याच्या सूचना मिसाळ त्यांनी दिल्या. याशिवाय जे कर्मचारी चांगले काम करीत आहेत, त्यांचा प्रामाणिकपणा लक्षात घेऊन बक्षीस म्हणून कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे प्रोतसाहनपर रक्कम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. 

एनएमएमटीतर्फे विविध ७२ मार्गांवर सेवा दिल्या जातात. त्यापैकी फक्त दहा मार्गातून एनएमएमटीला चांगले उत्पन्न मिळत आहेत; मात्र प्रमाणापेक्षा जास्त तोटा होत असलेल्या मार्गांवरील बस फेऱ्या बंद करण्याची मौलिक सूचनाही मिसाळ यांनी दिली. मिसाळ यांच्या सूचनांनुसार एनएमएमटी प्रशासनाने कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. 

स्मार्ट कार्ड लवकरच 
एनएमएमटीतर्फे २५ हजार स्मार्ट कार्ड पहिल्या टप्प्यात खरेदी केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. या स्मार्ट कार्डच्या आधारावर सर्व सार्वजनिक परिवहन सेवांचा लाभ घेता येणार आहे. तसेच एटीएम मशीनमधून रोख रक्कम व मॉलमध्ये खरेदी करता येणे शक्‍य होणार आहे. लवकरच हे कार्ड उपलब्ध झाल्यावर नागरिकांना अधिक चांगल्या सेवा एनएमएमटीतर्फे दिल्या जाणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com