esakal | "कुणीही पॅनिक होऊ नका"; लॉकडाऊनबाबत स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

"कुणीही पॅनिक होऊ नका"; लॉकडाऊनबाबत स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती वाढू नये म्हणून काय निर्बंध घालता येतील याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र लॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे कुणीही पॅनिक होण्याचं कारण नाही.  

"कुणीही पॅनिक होऊ नका"; लॉकडाऊनबाबत स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लॉकडाऊनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. लॉकडाऊन घेण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही किंवा तशी काही चर्चाही झालेली नाही असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय.

राज्यातील कोरोना स्थितीवर आपण पूर्णपणे लक्ष ठेऊन आहोत. महाराष्ट्राची कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी आहे.  इतर राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना आपली संख्या कमी झाली आहे. आपण सेफ झोनमध्ये आहोत. मात्र दिवाळीत आपल्या टेस्ट कमी झाल्या होत्या, त्या टेस्ट आपण वाढवत आहोत असंही राजेश टोपे म्हणालेत. 

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणालेत की, महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती वाढू नये म्हणून काय निर्बंध घालता येतील याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र लॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे कुणीही पॅनिक होण्याचं कारण नाही.   

महत्त्वाची बातमी : 'त्यांना' परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्या, नाव न घेता महाराष्ट्र भाजपाची उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली तक्रार

राजेश टोपे काय म्हणालेत : 

 • सर्व क्लेकटर यांना आपण टार्गेट देत आहोत
 • ज्या लोकांना कोविड होऊ शकतो आशा लोकांची टेस्ट केली पाहिजे असं सांगितलं आहे
 • टेस्टिंग वाढवावा यावर आजच्या बैठकीत भर होता
 • जगाच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली आहे
 • कोरोनाच्या लसीसंदर्भात चर्चा झाली 
 • पाच लसींवर काम करणार आहोत 
 • हेल्थवर्कर, पोलिस कर्मचारी आणि सिनियर सिटीझन यांना प्रधान्याने लस द्यायची आहे.
 • लस दिल्यानंतर त्याचा परिणाम किती महिने राहील हा देखील विषय आहे
 • लस कोणत्या तारखेला येणार याची अद्याप कल्पना नाही
 • लसीकरण कार्यक्रम हा केंद्र सरकार राबवणार आहे
 • हा खर्च राज्य सरकार करणार हे अद्याप सांगितलं नाही
 • त्यामुळे केंद्र सरकारला पाहिजे ती मदत करत आहे
 • लॉकडाऊन संदर्भात आद्यप कोणताही निर्णय अथवा चर्चा झाली नाही
 • आपण ज्यावेळी रुग्णसंख्येत शून्यावर जातो तेव्हा ती लाट संपली आणि जेव्हा नवीन रुग्ण सापडतात तेव्हा नवीन लाट आली असं म्हणता येईल
 • राज्य सरकारने एक कमिटी स्थापन केली आहे
 • मुख्य सचिव त्याचे अध्यक्ष आहेत आणि अर्थ विभाग, आरोग्य विभाग आणि वैदकीय शिक्षण विभागाचे अधिकारी या कमिटीमध्ये आहेत
 • लसीसंदर्भात ही कमिटी राज्य सरकारला अहवाल सादर करेल

no discussion about lockdown but few restrictions will be implemented says rajesh tope

loading image
go to top