मासेमारी व्यवसायाला ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

लॉकडाऊनमुळे मासेमारीसाठी आवश्‍यक साहित्य मिळत नसल्यामुळे एक आठवडा मासेमारी बंद करण्याचा निर्णय नवी मुंबईतील कोळीवाड्यांनी घेतला आहे. मासेमारी करण्यासाठी सरकारने अटी शिथिल केल्या असल्या, तरीही मासळी वाहतूक करण्यात पोलिसांकडून अडथळे आणले जात आहे. होड्या चालवण्यासाठी इंधन उपलब्ध होत नसल्याने पुढील एक आठवडा मासेमारी बंद करण्याचा निर्णय दिवाळे ग्रामस्थांनी घेतला आहे. 

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे मासेमारीसाठी आवश्‍यक साहित्य मिळत नसल्यामुळे एक आठवडा मासेमारी बंद करण्याचा निर्णय नवी मुंबईतील कोळीवाड्यांनी घेतला आहे. मासेमारी करण्यासाठी सरकारने अटी शिथिल केल्या असल्या, तरीही मासळी वाहतूक करण्यात पोलिसांकडून अडथळे आणले जात आहे. होड्या चालवण्यासाठी इंधन उपलब्ध होत नसल्याने पुढील एक आठवडा मासेमारी बंद करण्याचा निर्णय दिवाळे ग्रामस्थांनी घेतला आहे. 

नवी मुंबईसह उपनगरांमध्ये मुंबईतील भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात मासळीचा पुरवठा होत असतो. आधीच्या लॉकडाऊनमध्ये मासेमारीवर सरकारने बंदी केली होती; परंतु जीवनावश्‍यक बाबींमध्ये येत असल्यामुळे नंतर सरकारने ही बंदी उठवली. त्यामुळे समुद्रात पुन्हा मासेमारी सुरू झाली. मात्र, त्यावरही पोलिसांनी निर्बंध आणून जास्त खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मासेमारांना दिल्या आहेत. 

सावधान.... गाडी घेऊन बाजारात जाताय? दंड होईल!

अशा परिस्थितीत मासेमारी करून भाऊच्या धक्‍क्‍यावर लिलाव करण्यासाठी ग्राहक पोहोचत नसल्याने मासळीच्या लिलावावर परिणाम होत आहे. 
नवी मुंबईत भाऊच्या धक्‍क्‍यावरून मोठ्या प्रमाणात लोकलद्वारे मासळी येते; मात्र आता रेल्वे बंद झाल्यामुळे मासळी आणण्यात अडचणी येत आहेत. रस्ते वाहतुकीद्वारे मासळी आणताना पोलिसांची वारंवार परवानगी घ्यावी लागते. 
दिवाळे गावाला सर्वांत जास्त मासेमारी केली जाते. या गावात असणाऱ्या मासळी मार्केटमधून नवी मुंबईच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात मासळी विक्रीसाठी घेतली जाते. खारघर, तळोजा, कामोठे, पनवेल आदी भागांतही दिवाळे गावातून मासळी विक्रीसाठी आणली जाते. परंतु एप्रिल ते एप्रिल या दरम्यान गावातील मासेमारी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सबकी पसंत.. घरोघरी पुन्हा रामायण! दूरदर्शन नंबर वन वाहिनी...

संघटनांचा निर्णय 
गावातील मच्छीमार डोलकर सेवा संस्था, फगेवाले मच्छीमार संस्था, खांदेवाले मच्छीमार कल्याणकारी संस्था, समस्त दिवाळे ग्रामस्थ मंडळ, दिवाळे युवा सामाजिक संस्था या सर्व संघटनांनी एकत्र येऊन मासळी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातून नवी मुंबई शहरात आणि शेजारच्या परिसरात जाणारी मासळीही काही दिवसांपर्यंत बंद होणार असल्याने नवी मुंबई शहरात मासळीचा तुटवडा निर्माण होणार आहे. 

सरकारने बंदीतून मासेमारी वगळली असली, तरी मासेमारी करण्यासाठी आवश्‍यक असणारे साहित्य उपलब्ध होत नाही. होडीसाठी इंधन, मासळीच्या वाहतुकीसाठी वाहन, साठवणुकीसाठी बर्फ आदी बाबींमुळे मारलेली मासळीही वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे एक आठवडा मासेमारी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- परशुराम पाटील, अध्यक्ष, समस्त दिवाळे ग्रामस्थ मंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No fishing for one week in Navi Mumbai