जुन्या नोटा जमा करणाऱ्यांची चौकशी नाही

पीटीआय
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

रिझर्व्ह बॅंकेकडून आधीच्या नियमात सुधारणा; "केवायसी' असलेल्यांना सवलत
मुंबई - बॅंकांमध्ये जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत पाच हजार रुपयांपेक्षा अधिक जमा करण्यासाठी घातलेले नियम रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी मागे घेतले. "केवायसी' असलेल्या खातेधारकांना बॅंक कितीही वेळा पैसे जमा केले तरी प्रश्‍न विचारणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी बॅंकांमध्ये जुन्या नोटा पाच हजार रुपयांपर्यंत 30 डिसेंबरपर्यंत केवळ एकदाच जमा करता येतील, असे म्हटले होते. यापेक्षा जास्त वेळा आणि जास्त रक्कम असल्यास ती आतापर्यंत जमा न करण्याचे कारण खातेधारकांनी बॅंक अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करण्यात आले होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल खातेधारकांना 30 डिसेंबरपर्यंत एकरकमी जुन्या नोटा जमा करणाऱ्यांना त्रास देण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते.

रिझर्व्ह बॅंकेने "केवायसी' खातेधारकांसाठी नियम शिथिल केला असला, तरी "बिगरकेवायसी' खातेधारकांना हा नियम लागू असेल. रिझर्व्ह बॅंकेने आधी जाहीर केलेल्या निर्णयामुळे देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. केंद्र सरकारने आधी 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करण्यासाठी मुदत दिलेली असताना हे नवे निर्बंध कशासाठी, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित होत होता. यातच नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वैतागलेल्या बॅंकांनीही हात वर केले होते. बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांवर बोट ठेवून पाच हजार रुपयांपेक्षा अधिक जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले होते.

टीकेनंतर निर्णय मागे
रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयावर सर्व क्षेत्रांतून टीकेची झोड उठली होती. यामुळे अखेर रिझर्व्ह बॅंकेने माघार घेत आधीच्या निर्णयात सुधारणा केली आहे. आता "केवायसी' असलेल्या खातेधारकांना बॅंकांत कितीही वेळा जुन्या नोटा जमा करता येणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेकडून दररोज जाहीर होत असलेल्या नव्या नियमांबद्दल सामान्य जनतेसह बॅंकिंग क्षेत्रानेही रोष व्यक्त केला होता.

Web Title: No inquiry of the victims gathered in the old currency