जंकफूड नको रे बाबा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

तेलात तळलेले आणि अजिनोमोटो-सॉस यांचा भडिमार असलेले चायनीज पदार्थ, तळकट वडे-सामोसे, पाव आणि पिझ्झा-बर्गर यांना जंकफूड मानले जाते. त्याचे दुष्परिणाम माहीत असल्याने ते मर्यादेतच खावेत यावर आजच्या तरुणांचे एकमत आहे. ‘युजीसी’ने कॉलेज कॅंटीनमध्ये त्यांच्यावर लादलेली बंदी योग्य आहे, अशी प्रतिक्रिया तरुणाईने व्यक्त केली...

जंकफूड कॅंटीनमध्ये नसेल तर चांगलेच आहे. जंकफूड चविष्ट असले तरी शरीराला हानिकारक आहे. आमच्या कॉलेजातही चायनीज, नूडल्स, वडापाव आदी पदार्थ मिळतातच; पण आता त्यांना पौष्टिक पर्याय मिळायला हवा. 
- दीपाली बोडवे (गुरू नानक कॉलेज)

जंकफूड टेस्टी असल्याने तरुणांना ते आवडते. तरीही ते एका मर्यादेतच खाल्ले पाहिजे. त्याची चव चांगली असल्याने जंक फूड थोडेतरी हवेच; पण अर्थातच पौष्टिक खाण्यावरही भर दिला पाहिजे. 
- आर्यमन उमेश राव (के. ई. एस. श्रॉफ कॉलेज)

जंकफूड फार खाणे चांगले नाहीच. तरुणांनी  फळे-भाज्या खाण्यावर भर द्यावा. आमच्या कॉलेजातही सॅण्डविच आणि चायनीज मिळते. वडापाव-सामोसे फारसे चालत नाहीत. ‘युजीसी’ने घेतलेला निर्णय चांगला आहे.
- प्रफुल्ल चिखलकर (सिडनेहॅम कॉलेज) 

जंकफूडवर बंदी चांगलीच आहे. ते जास्त प्रमाणात खाल्ले तर नंतर मोठे आजार होऊ शकतात. मी कधी कधी जंक फूड खाते. आमच्या कॅंटीनमध्येही ते मिळते. पण आता ते खाताना विचार करावा लागेल.
- अमृता तेली  (डी. जे. रूपारेल कॉलेज)  

बंदीपेक्षाही आपण जंकफूड किती खावे, हे प्रत्येकाला कळले पाहिजे. रोज जंकफूड खाणे चांगले नाही. मीदेखील दोन आठवड्यांतून एकदा जंकफूड खातो. मात्र, आपण घरच्या जेवणावर भर दिला पाहिजे. 
- साहील खोचरे (पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍ट) 

Web Title: No Junkfood says youth