धारावी ते माहीममध्ये शुक्रवारी एकही नवा रुग्ण नाही

कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोविड हॉटस्पॉट असलेल्या धारावीसह दादर आणि माहीममध्ये शुक्रवारी एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नाही.
Corona Virus
Corona VirusSakal
Summary

कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोविड हॉटस्पॉट असलेल्या धारावीसह दादर आणि माहीममध्ये शुक्रवारी एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नाही.

मुंबई - कोरोनाच्या (Corona) सुरुवातीच्या टप्प्यात कोविड हॉटस्पॉट (Hotspot) असलेल्या धारावीसह (Dharavi) दादर आणि माहीममध्ये (Mahim) शुक्रवारी एकही कोरोनाचा नवा रुग्ण (Corona Patients) आढळला नाही. मुंबईत (Mumbai) कोरोनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षांत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तिन्ही लाटांमध्ये पहिल्यांदाच शुक्रवारी जी/उत्तर प्रभागांतर्गत तीनही कोरोना संवेदनशील भागात शून्य रुग्णांची नोंद झाली.

तिसर्‍या लाटेत,  6 जानेवारीला धारावीमध्ये कोरोनाचा उच्चांक होता, तर, दादर आणि माहीममध्ये 7 जानेवारीला कोरोनाचा उच्चांक होता. 6 जानेवारीला धारावीत सर्वाधिक 107 कोरोना रुग्ण आढळले, तर 7 जानेवारीला दादरमध्ये 250 आणि माहीममध्ये 350 रुग्ण आढळले. मात्र शुक्रवारी या तिन्ही भागात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, कोरोनाच्या काळात पहिल्यांदाच या भागात एकाच वेळी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

शून्य आकडेवारीची नोंद -

तिसऱ्या लाटेत, धारावीमध्ये 28 जानेवारीला प्रथमच शून्य रुग्ण आढळले. त्यानंतर 12, 13 आणि 18 फेब्रुवारी रोजी येथे एकही केस आढळला नाही. दादर आणि माहीमचीही तीच स्थिती आहे. तिसऱ्या लाटेत दादरमध्ये 13 फेब्रुवारीला पहिल्यांदाच कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यानंतर 14 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी आणि आता 18 फेब्रुवारी रोजी येथे शून्य  नवीन रुग्ण आहेत. 14 फेब्रुवारी रोजी माहीममध्ये नवीन रुग्णांची संख्या शून्य होती. यानंतर शुक्रवारी येथे रुग्ण नोंदले गेले.

Corona Virus
'बेस्ट'च्या 3600 कोटींचा घोटाळा बाहेर काढणार- आमदार मिहिर कोटेचा

तिन्ही भागात फक्त 28 सक्रिय रुग्ण -

सध्या धारावी, माहीम आणि दादर भागात सक्रिय रुग्णांची संख्या केवळ 28 आहे. यामध्ये धारावीत 4, दादरमध्ये 3 आणि माहीममध्ये 21 रुग्ण आहेत. पालिकेच्या म्हणण्यानुसार, धारावी आणि दादरमधील एक रुग्ण रुग्णालयात दाखल आहे, तर माहीमच्या 6 कोरोना रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धारावीतील 5, दादरमधील 5 आणि माहीममधील 19 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

सर्वाधिक रुग्ण माहीममध्ये -

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये सापडलेल्या रुग्णांची संख्या पाहिली तर माहीममध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत धारावीत 8639, दादरमध्ये 13524 आणि माहीममध्ये 14,546 रुग्ण आढळले असून त्यापैकी धारावीमध्ये 8216, दादरमध्ये 13215 आणि माहीममध्ये 14260 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

धोरण कामी आले -

किरण दिघावकर म्हणाले की, पहिल्या लाटेच्या वेळी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जी रणनीती आखण्यात आली होती ती सातत्याने सुरू राहिली. पहिल्या लाटेत, चाचणी, ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि उपचार या चार सूत्री कार्यक्रमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. दुसऱ्या लाटेतही हीच रणनीती सुरू ठेवण्यात आली. यासोबतच येथे लसीकरणावरही भर देण्यात आला. यामुळेच तिसरी लाटही आमच्या इथे नियंत्रणात राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com