
मुंबई : म्हाडाच्या मुंबई शहर आणि उपनगरातील दुकानांच्या खरेदीसाठी गिऱ्हाईकच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. मुंबई मंडळाने १४९ दुकानांच्या विक्रीसाठी ई-लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, त्यामध्ये केवळ ७२ दुकानांना इच्छुकांकडून बोली आली आहे, तर अर्ध्याहून अधिक म्हणजे जवळपास ७७ दुकानांसाठी कोणीच बोली लावलेली नाही. त्यामुळे न विकलेल्या दुकानांची कशी विक्री करावी, असा म्हाडासमोर प्रश्न उभा राहिला आहे.