उल्हासनगरात नो प्लॅस्टिक कॅम्पेन सायकल रॅली संपन्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

उल्हासनगर : प्लॅस्टिक नकोच अशी जनजागृती करण्यासाठी उल्हासनगरात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ-उल्हासनगर महानगरपालिका आणि हिराली फाऊंडेशनच्या वतीने नो प्लॅस्टिक कॅम्पेन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

उल्हासनगर : प्लॅस्टिक नकोच अशी जनजागृती करण्यासाठी उल्हासनगरात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ-उल्हासनगर महानगरपालिका आणि हिराली फाऊंडेशनच्या वतीने नो प्लॅस्टिक कॅम्पेन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धनंजय पाटील,पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे,हिराली फाऊंडेशनचे पुरुषोत्तम खानचंदानी,सरिता खानचंदानी यांनी रॅलीसाठी पुढाकार घेतला होता.
शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गोल मैदान येथून निघालेल्या सायकल रॅलीची सकाळी 11 वाजता सेंच्युरी रेयॉन कंपनी जवळ सांगता झाली.या रॅलीसाठी प्रभाग एकचे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती.रॅली यशस्वी होण्यासाठी सेंच्युरी रेयॉन कंपनी व कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशन सहकार्य केले.

उल्हासनगरातील संपूर्ण वॉट्सअप ग्रुप,फेसबुक या मासमीडियावर सायकल रॅलीची जनजागृती करण्यात आल्याने त्यास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.यात एक हजार विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.पाणी पुरवठा अभियंता कलई सेलवन,प्रशासनाधिकारी भाऊराव मोहिते विविध एनजीओ संस्था,समाजसेवक शशिकांत दायमा आदींनी या रॅलीत सहभाग घेतल्याची माहिती सरिता खानचंदानी यांनी दिली.

Web Title: no plastic campaign cycle rally in ulhasnagar