नॅशनल पार्कातील बिबट्यांवर विषप्रयोग नाही

नेत्वा धुरी
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

शरीर खोलल्यानंतरच विष आढळले 
गोरेगाव येथील पशुवैद्यकीय अधिका-यांच्या टीमने मृत बिबट्यांचे शवविच्छेदन केले होते. बिबट्‌यांचे शरीर खोलल्यानंतर शरीरातील रक्तवाहिनीजवळ तसेच अवयवांच्या जवळ निळसर रंगाचे विष आढळून आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपुर्वी बिबट्यांवर झालेल्या विषप्रयोगाने नवे वळण घेतले आहे.मृत्यू झालेल्या दोन बिबट्यांचा न्यायवैदयकिय अहवालात विषप्रयोग झालेले नसल्याचे नसल्याचे नमुद करण्यात आले आहे तर यापुर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालात विषामुळे मृत्यू झाल्याचे नमुद करण्यात आले होते. 

म्हशीचे मांस खावून सप्टेंबर महिन्यात दोन बिबट्यांच्या मृत्यू झाला होता.11 सप्टेंबरला मास खाल्यानंतर सुरज नावाच्या दहा महिन्यांच्या बिबट्याच्या पिल्लाचा त्याच रात्री मृत्यू झाला. तर, भंडरदरा या 10 वर्षाच्या नर बिबट्याचा 18 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता.गोरेगाव येथील सरकारी पशुवैद्यकिय महाविद्यालयातील पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदनात या दोन्ही बिबट्यांच्या शरिरात विष आढळून आले होते.त्यांनंतर बिबट्यांवर विष प्रयोग झाल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला होता. 
या आरोपांमुळे न्यायवैद्यकिय तपासणी करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला होता.

त्यानुसार कलिना येथील सरकारी प्रयोगशाळेत ही तपासणी करण्यता आली.मात्र,या न्यायवैद्यकिय तपासणीत विष आढळून आले नाही..न्यायवैद्यक अहवालात विष आढळले नसल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठ वनअधिका-यांशी बोलून कारवाईची दिशा ठरवू, अशी माहिती उद्यानाचे संचालक व मुख्यवनसंरक्षक अन्वर अहमद यांनी दिली. 

न्यायवैद्यक अहवाल 
- सूरज या अकरा महिन्यांच्या नर बिबट्याचे पोट, आतडी, फ्लिहा, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, हृदयातील विसेरामध्ये विष आढळलेले नाही 
- भंडारदरा या बारा वर्षीय बिबट्याच्या जठर, आतडी, फुफ्फुस, यकृत, प्लिहा, मूत्रपिंडे, मेंदू, अधिवृक्क ग्रंथी आणि उलटीच्या नमुन्यात विष आढळलेले नाही. 

शरीर खोलल्यानंतरच विष आढळले 
गोरेगाव येथील पशुवैद्यकीय अधिका-यांच्या टीमने मृत बिबट्यांचे शवविच्छेदन केले होते. बिबट्‌यांचे शरीर खोलल्यानंतर शरीरातील रक्तवाहिनीजवळ तसेच अवयवांच्या जवळ निळसर रंगाचे विष आढळून आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

Web Title: no poison in the National Park's leopard in Mumbai