कोरोनाच्‍या दहशतीमुळे रंगपंचमी फिकी; दुकानात निम्‍मा माल पडून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

पाली : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या भीतीने चिकन, हॉटेल व चायनीज व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. त्यासह हंगामी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवरदेखील कोरोनाचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी रंग व पिचकाऱ्या खरेदीसाठी हात आखडता घेतला. कोरोनाच्या दहशतीमुळे चिनी मालाला भारतीय बाजारपेठेतून मागणी नव्हतीच; मात्र भारतीय बनावटीचा मालदेखील कोरोनाच्या दहशतीने विकला गेला नाही. त्यामुळे बहुतांश विक्रेत्यांनी खरेदी केलेला निम्म्याहून अधिक माल तसाच पडून आहे.

पाली : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या भीतीने चिकन, हॉटेल व चायनीज व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. त्यासह हंगामी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवरदेखील कोरोनाचे संकट ओढवले आहे.

कोरोनाच्या भीतीने अनेकांनी रंग व पिचकाऱ्या खरेदीसाठी हात आखडता घेतला. कोरोनाच्या दहशतीमुळे चिनी मालाला भारतीय बाजारपेठेतून मागणी नव्हतीच; मात्र भारतीय बनावटीचा मालदेखील कोरोनाच्या दहशतीने विकला गेला नाही. त्यामुळे बहुतांश विक्रेत्यांनी खरेदी केलेला निम्म्याहून अधिक माल तसाच पडून आहे.

महत्‍वाची बातमी : सुंदर समुद्रकिनारे, गड सुनेसुने 

रायगड जिल्ह्यात सुमारे 400 विक्रेते आहेत. जिल्ह्यामधील विविध दुकानांमध्ये देशी रंग, वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या आदी लाखो रुपयांचा माल दुकानदारांनी भरून ठेवला होता. पर्यावरणपूरक व सुक्‍या रंगांना जास्त पसंती असल्याने तोही माल दुकांनात मुबलक होता.

कोरोनाच्या भीतीने अनेकांनी रंग व पिचकाऱ्या खरेदी केल्याच नसल्याचे विक्रेता सुनील गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता यांनी यावर्षी 40 ते 50 हजारपर्यंत मालविक्रीसाठी ठेवला आहे. यातील फक्‍त 20 ते 22 रुपयांपर्यंत मालांची विक्री झाली आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक माल तसाच पडून असल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे खबरदारी म्हणून या वर्षी धूलिवंदन खेळलो नाही. त्यामुळे रंग व पिचकऱ्यांची खरेदीदेखील केली नसल्याचे विद्यार्थिनी निर्मिती म्हात्रे यांनी सांगितले.

मोठी बातमी : टीव्‍ही मालिका, चित्रपटांचे शूटींग ३१ मार्चपर्यंत बंद! 

पालकांची पाठ 
कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिचकाऱ्या व रंगांची विक्री निम्म्याने कमी झाली. त्यामुळे व्यापारी व व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागले. रंग आणि पिचकाऱ्या चीनहून आल्या असून त्यामध्ये कोरोना विषाणू आहे. त्यामुळे ते खरेदी करू नका, असे दस्तुरखुद्द बच्चेकंपनी पालकांना सांगत होते, असे रूपेश ठाकूर यांनी सांगितले. मुंबईला घाऊक बाजारातदेखील बहुतांश ठिकाणी चिनी मालावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. स्थानिक बाजारपेठेतदेखील अनेक दुकानदारांनी चिनी माल न विकण्याचे ठरविले; मात्र देशी माल असूनही तो चिनी समजून अनेकांनी खरेदी केला नाही. 

होळी व धुळवडीसाठी दुकानात मुबलक माल भरून ठेवला होता. या वर्षी सुमारे 20 हजारपर्यंत माल दुकानात ठेवला होता; मात्र कोरोनाच्या भीतीने रंग, पिचकाऱ्या व इतर सामग्री फारशी खरेदी केली नाही. निम्मा मालदेखील विकला गेला नाही. खूप नुकसान झाले आहे. 
- रूपेश ठाकूर, व्यावसायिक, पाली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No sales of Rang Panchami material