पोलिसांबाबत सबळ  पुरावे नाहीत : सीबीआय

File Photo
File Photo

मुंबई : वडाळा पोलिस ठाण्याच्या कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी आठ पोलिस कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल होण्याइतपत सबळ पुरावे नाहीत, अशी माहिती "सीबीआय'ने गुरुवारी (ता. 21) उच्च न्यायालयात दिली.

अग्नेलो वल्दारिस (वय 25) याला पोलिसांनी एप्रिल 2014 मध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती; मात्र जबर मारहाणीमुळे त्याचा कोठडीत मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या वडिलांनी न्यायालयात याचिकेद्वारे केला आहे. न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने गुरुवारी याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला. मृताच्या शरीरावर लैगिंक अत्याचाराच्या आणि मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत.

तसेच, पोलिसांनी काही नोंदींबाबत "स्टेशन डायरी'त छेडछाड केल्याचेही दिसत आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. सीबीआयने या प्रकरणात आठ पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे; मात्र हत्येचा गुन्हा दाखल होण्याइतपत सबळ पुरावे नाहीत, असे सीबीआयने सांगितले. अग्नेलोच्या वडिलांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सीबीआयच्या वतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com