मुंबईकरांना नो टेन्शन, वर्षभर पाणीकपात नाही

मुंबईकरांना यंदाच्या मॉन्सूनआधीच पाणीकपातीची झळ बसली होती. परंतु यावर्षी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात संपूर्ण वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे.
water supply
water supplysakal
Summary

मुंबईकरांना यंदाच्या मॉन्सूनआधीच पाणीकपातीची झळ बसली होती. परंतु यावर्षी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात संपूर्ण वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे.

मुंबई - मुंबईकरांना यंदाच्या मॉन्सूनआधीच पाणीकपातीची झळ बसली होती. परंतु यावर्षी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात संपूर्ण वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. यंदा कमी वेळेत चांगल्या पावसामुळेच मुंबईकरांचे संपूर्ण वर्षभराचे पाण्याचे टेन्शन कमी झाले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सध्या ९७.४६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागाने पहिल्याच आठवड्यात घेतलेल्या आढाव्यानुसार मुंबईला संपूर्ण वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी मॉन्सूनपर्यंत पाणी पुरवठ्यात कोणतीही कपातीची वेळ येणार नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात आजस्थितीला ७ ऑक्टोबर रोजी ९७.४६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालिकेकडून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार आगामी मॉन्सून कालावधीपर्यंत शहराला पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती पालिकेच्या जलविभागाचे प्रमुख अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांनी दिली. त्यामुळे येत्या दिवसात मुंबईत कोणतीही पाणी कपात नसेल असेही त्यांनी सांगितले.

यावर्षी २०२२ मध्ये १४ लाख १० हजार ६२६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात आहे. गेल्या वर्षी २०२१ मध्ये १४ लाख ३४ हजार ३९१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा (९९.१०) टक्के इतका उपलब्ध होता. तर २०२० मध्ये १४ लाख २४ हजार २५७ दशलक्ष लिटर (९८.४०)टक्के इतका पाणीसाठी उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाणी पुरवठ्याच्या उपलब्धतेत मोठा फरक आढळून आलेला नाही. तसेच ऑक्टोबरमध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानेच मुंबईकरांचे पाणीसंकट टळले आहे.

तलावनिहाय उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

तलाव पाणीसाठा

अप्पर वैतरणा २२७०४७

मोडक सागर १२८९२५

तानसा १४५०८०

मध्य वैतरणा १९३५३०

भातसा ७१७०३७

विहार २७६९८

तुलसी ८०४६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com