धमकी नाही, फक्‍त विनंती केली - महादेव जानकर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मुंबई - कॉंग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही. अथवा धमकी दिली नाही. मी संबंधित अधिकाऱ्याला यात लक्ष घालण्याची विनंती केली होती, असा खुलासा राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे.

जानकर यांनी नगर परिषद निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याबाबत संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला फोनवरून धमकी दिली होती, अशा आशयाची क्‍लीप वाहिन्यांनी दाखवली होती. त्यावर गदारोळ उठला होता. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे कळवले आहे.

जानकर यांच्या खुलाशाची दखल घेत निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवाल गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला आहे. त्याचबरोबर जानकर यांच्याबाबतचे वृत्त ज्या वाहिन्यांनी दाखवले आहे. त्यांच्याकडून याबाबतची अधिक माहिती घेऊन पुढील निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचे समजते. जानकर गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषदेतील उमेदवारांबाबत फोन केला असल्याचे वृत्त आहे.

Web Title: No threat, just request