आता बारावीत कोणीही होणार नाही अनुत्तीर्ण! सरकारने घेतला हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

  • अनुत्तीर्ण शब्द यापुढे गुणपत्रिकेवरून गायब होणार
  • "इलिजिबल फॉर री एक्‍झाम' असा मिळणार शेरा 
     

मुंबई : दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरून अनुत्तीर्ण शब्द हटविल्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. दहावीच्या धर्तीवर बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर सुधारित शेरे देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण हा शब्द यापुढे वापरण्यात येणार नसून त्याऐवजी "इलिजिबल फॉर री एक्‍झाम' असा शेरा देण्यात येणार आहे. हा निर्णय फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेपासून लागू होणार आहे. 

हेही वाचा - तापमानवाढीमुळे राज्यात विजेची मागणी वाढली

परीक्षा देणारा विद्याथीं अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याच्या मानसिक व शारिरीक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शब्द न वापरता विद्यार्थी पुरवणी परीक्षेत श्रीणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र असा शेरा देण्यात येत आहे.

हे वाचलंत का - कोरोनाच्या प्रकोपातून महाराष्ट्रातील 5 जणांची सुटका

त्याच धर्तीवर बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर सुधारित शेरा देण्यात येणार आहे. विद्यार्थी नियमित परिक्षेतील सर्व विषयात उत्तीर्ण असल्यास गुणपत्रिकेवर उत्तीर्ण शेरा मिळेल. तर नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण असणारे तसेच तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर "इलिजिबल फॉर री एक्‍झाम' हा शेरा देण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no will going to fail in XII