हॉस्पिटलsss नको रे बाबा ! आता नॉन कोविड रुग्णांनाही वाटू लागलीय भिती, कारण...

हॉस्पिटलsss नको रे बाबा ! आता नॉन कोविड रुग्णांनाही वाटू लागलीय भिती, कारण...

मुंबई : दिवसेंदिवस कोविड 19 च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या तसेच शहरातील एकंदरीत परिस्थिती पाहता मुंबईकर चिंतेत आहेत. त्यातच रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर वैद्यकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने या चिंतेत भर पडली असून हॉस्पीटलमध्ये जाण्याची नागरिकांमध्ये भिती आहे. मात्र भीतीपोटी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन डॉक्टर्स करतायत. 

कोरोना संसर्गाचा वैद्यकीय क्षेत्रालाही फटका बसला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापार्यंत 18 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. 900 बाधित तर 1500 वैद्यकीय कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे रुग्णांमध्ये हॉस्पिटलबाबत भीती बसली आहे. भितीपोटी नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून स्वतःच्या मनानेच औषधोपचार करण्याचा धोका पत्करत आहेत. एकीकडे पावसाळी आजार तर दुसरीकडे कोरोनाची लक्षणे काही प्रमाणात सारखी असून डॉक्टरांनाही उपचारांमध्ये अनेक आव्हाने पेलावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या पावसाला चांगली सुरुवात झाली असून पावसाळी आजार पसरत आहेत. यामध्ये ताप, सर्दी, श्वसन विकारांनीही डोके वर काढले आहे. या आजारांची लक्षणे तसेच कोविड 19ची लक्षणे जवळपास सारखी असल्याने रोगाचे निदान करणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

विविध लक्षणे दिसत असूनही नागरिक कोरोनाच्या भितीपोटी नातेवाईक, परिसरातील शेजारी तसेच डॉक्टरांना याविषयी माहिती न देता घरबसल्या स्वतःच्या मनाने औषधोपचार करत आहेत. असे करणे त्यांच्या आरोग्यास घातक असून त्याची मोठी किंमत या नागरिकांना मोजावी लागू शकते असा इशारा  मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलचे इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ तुषार राणे यांनी दिला आहे.

आजारांकडे दुर्लक्ष केल्यास यामध्ये गुुंंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. अशात गुंतागुंत वाढल्यास, तब्येत खालावल्यास शेवटच्या क्षणी नागरिक रुग्णांलयाला भेट देत असल्याने डॉक्टरांना अशा वेळी रुग्णाला धोक्याबाहेर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. अशा वेळी कमीत कमी वेळात योग्य निदान करणे डॉक्टरांकरिता अवघड झाले असून उपचारास विलंब झाल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो असं डॉ राणे यांनी स्पष्ट केलं. 

कोरोना काळात रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनदेखील योग्य खबरदारी घेत आहे. कोविड19 आणि नॉन कोव्हीड रुग्णांना कशा प्रकारे हाताळावे याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शिवाय गेल्या तीन महिन्यात सोशल मिडीया तसेच इतर माध्यमांमधून नागरिकांना कोरोनाची लक्षणांबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे. मात्र हीच लक्षणे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजारांमध्येही पहायला मिळत असल्याने त्यांचा गोंधळ उडत आहे आणि निदान करणे देखील अवघड ठरत आहे. अशा वेळी मनाने औषधोपचार न घेता वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे डॉक्टर राणे यांनी सुचवले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

non covid patients also have fear of hospital in their mind check reason

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com