गुंतवणुकीस होकार दिला आणि तिथेच फसलेत, फ्लॅट खरेदीच्या नावाखाली साडे बारा कोटींना गंडवलं

गुंतवणुकीस होकार दिला आणि तिथेच फसलेत, फ्लॅट खरेदीच्या नावाखाली साडे बारा कोटींना गंडवलं

मुंबई : माटुंगा येथील व्यावसायिक आणि त्याच्या नातेवाईंकांची  फ्लॅट खरेदीच्या बहाण्याचे साडे बारा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन विकासक आणि चार कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

तक्रारदार बीपीन सावला याचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. सावला यांच्या परिचयाच्या दोन विकसकांनी 2013 मध्ये भेट घेतली. त्यावेळी त्यांनी चार कंपन्याच्या माध्यमांतून त्यांचे भांडूप व वडाळा येथे बांधकाम प्रकल्प सुरू असल्याचे सांगितले. त्यावेळी या प्रकल्पांमधील सदनिकांमध्ये गुंतवणूक केल्यास 12 टक्के व्याज दराने चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. त्याबाबत सावला यांनी कुटुंबियांसोबत तसेच मेहूणे कैलाश वीरा व अमर वीरा यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनीही सावला यांच्यासोबत गुंतवणूकीस होकार दिला.

त्यानंतर सावला यांनी सबंधीत विकसकांसोबत चर्चा केल्यानंतर या व्यवहाराचे रितसर कागदपत्रे बनवण्याबाबत सांगितले. त्यावेळी त्यांनी प्रकल्पांना परवानगी मिळाल्यानंतर याबाबत रितसर कागदपत्रे बनवण्यात येतील. तसेच सध्या पैशांची आवश्यकता असल्यामुळे बँकेमार्फत पैसे देण्यास सावला यांना सांगण्यात आले. त्यांतर सावला यांनी तीन व त्यांच्या नातेवाईकांनी चार अशा सात सदनिका खरेदी करण्याचे ठरवले. त्यावेळी हे प्रकल्प 2016 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन सावला यांना देण्यात आले होते.

वारंवार मागे लागून अखेर 2015 मध्ये या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली. त्यावेळी नऊ कोटी 85 लाख रुपये तसेच एक कोटी रुपये नोंदणीचे संबंधीत व्यवसायिक व कंपन्यांच्या खात्यावर सावला व त्यांच्या नातेवाईकांनी वळते केले. त्यानंतर 2016 मध्ये काम पूर्ण झाले नाही. त्यावेळी सावला यांना 2018 पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. MOU नुसार 2018 मध्येही काम पूर्ण झाले नाही. याबाबत विचारणा केली असता विकसकाकडून सावला यांच्याबाबतीत टाळाटाळ केली जाऊ लागली.

त्यानंतर नातेवाईकांकडूनही याबाबत सावला यांच्याकडे विचारणा होऊ लागल्यानंतर अखेर त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार भोईवाडा पोलिस ठाण्यात दोन विकासक व चार कंपन्यांविरोधात 12 कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका अधिनियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

businessman from mumbai duped for 12 crore 5 lakhs read full news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com