chhatrapati shivaji maharaj hospital kalwa
sakal
ठाणे - ठाणे महानगर पालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमी विविध कारणांनी चर्चेचे केंद्र बिंदू ठरत आहे. अशातच याच रुग्णालयातील आनंद दिघे हृदयरोग केंद्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामूळे काँग्रसच्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, कुटुंबाला तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.