मंत्रीपदाच्या अपेक्षेने नाही तर पाठिंबा हिंदुत्वासाठी - आमदार राजू पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Not expectation of ministerial post support for Hindutva MLA Raju Patil mumbai

मंत्रीपदाच्या अपेक्षेने नाही तर पाठिंबा हिंदुत्वासाठी - आमदार राजू पाटील

डोंबिवली - भाजपच्या कोट्यातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची जोरदार चर्चा आहे. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आमदार पाटील म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत भाजपाला पाठिंबा दिला, राष्ट्रपती निवडणूकीत देखील त्यांना पाठिंबा देत आहोत. हा पाठिंबा हिंदुत्वासाठी दिला आहे आणि याच करता आम्ही सरकार मध्ये आहोत. कोणत्याही अपेक्षेने किव्हा मंत्रिपदाच्या अपेक्षेने आम्ही या सरकारला पाठिंबा दिला नाही असे आमदार पाटील यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, मनसेच्या एका नेत्याला भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेत आमदारकी मिळणार आहे अशी चर्चा आहे. यावर मनसे आमदार यांनी सांगितले की जर विधानरिषदेवर आमच्या पक्षातील नेते आमदार म्हणून जात असतील आणि आमदारकी मिळत असेल तर आनंदच आहे, दोन्ही हाऊस मध्ये आमचा आवज असेल आणि अशी गोष्ट घडली तर स्वागत आहे. राज्यसभा निवडणूकीत मनसे आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यांच्या एका मताला महत्त्व आले होते.

मनसेच्या या सहकार्यामुळे त्यांना नव्या सरकारकडून भाजपा कोट्यातून मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आमदार पाटील म्हणाले, आम्ही जो आतापर्यंत भाजपला पाठिंबा दिला आणि आता पण राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देतो आहे, तो हिंदुत्वासाठी दिला आहे आणि याच करता आम्ही सरकार मध्ये आहोत. कोणत्याही अपेक्षेने किंवा मंत्रिपदाच्या अपेक्षेने आम्ही या सरकारला पाठिंबा दिला नाही. पेट्रोल , डिझेल भाव या सरकारने कमी केले, या निर्णयाचे मनसेकडून स्वागत करण्यात आले असून मनसे आमदार पाटील यांनी सांगितले की हे सरकार जनहिताचा निर्णय घेत आहेत आणि पुढेही घेतली ही अशा करतो.

Web Title: Not Expectation Of Ministerial Post Support For Hindutva Mla Raju Patil Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..