
'असे तयार होतात चविष्ट संजय राऊत', किरण मानेंची फेसबूक पोस्ट चर्चेत
महाराष्ट्रात(Maharashtra) गेल्या काही दिवसांत जी काही मोठी राजकीय उलथापालथ झाली त्यावर सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविकास आघाडीला दणका देता शिंदेगटानं भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केलं. पण यामुळे किती जण खूश अन् किती नाराज याचा काही अंदाज अद्याप लावता येत नाही. या राजकीय नाट्यावर मनोरंजन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी व्यक्त झालेले दिसून आले. त्यात अभिनेते किरण माने यांच्या पोस्टनी सोशल मीडियावर जरा जास्तच लक्ष वेधून घेतलं. आता याच किरण मानेंनी(Kiran Mane) राजकीय परिस्थितीवर भाष्य करत एक पोस्ट(Facebook Post) शेअर केली आहे आणि त्या माध्यमातू थेट शिवसेना नेता खासदार संजय राऊत(Sanjay raut) यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसून आलं आहे. नेमकं काय लिहिलंय किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये? चला,जाणून घेऊया(Kiran Mane facebook Post On Politics,Target Shivsena leader sanjay Raut)
हेही वाचा: KAALI Controversy: कोण आहे लीना मणिमेकलई?तिला अटक करण्याची का होतेय मागणी?
किरण माने नेहमीच कोणत्याही सामाजिक,राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दिसतात. सोशल मीडियावर ते भलतेच सक्रिय पहायला मिळतात. त्यांनी सध्या केलेल्या एका फेसबूक पोस्टमध्ये राजकीय नेत्यांची नावं घेत संजय राऊतांवर नकळत टीका करण्याचं धाडस केलं आहे. एखाद्या पदार्थाची रेसीपी जशी सादर केली जाते अगदी त्याच स्टाईलने त्यांनी राजकीय नेते मंडळींना पोस्टच्या माध्यमातून सादर केलं आहे. एक राजकीय डीशच म्हणूया नं आपण किरण मानेंच्या या पोस्टला.

KIran Mane Post Image
किरण माने यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे की,''साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई - दोघांपैकी जे हाताशी असेल ते.. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट 'संजय राऊत' तयार होतात !''
हेही वाचा: 'मला अनिल कपूर नवरा म्हणून ...', 33 वर्षांपूर्वी माधुरीनं केलेलं मोठं विधान
सध्या किरण मानेंच्या या पोस्टची भलतीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,''उरले सुरले तोंडी लावायला ठेवलेत का लोणचं म्हणून सर'',अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली आहे तर एकानं ,''तीन पाकळ्या नेपाळी राणेंना टाकलं नाही म्हणून जाहीर निषेध'',असं म्हटलं आहे.
Web Title: Kiran Mane Facebook Post On Politicstarget Shivsena Leader Sanjay
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..