नोटाबंदी संक्रांतीच्या पथ्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

हलव्याचे दागिने स्वस्त

पनवेल - नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे संक्रांत. त्यासाठी हलव्याच्या दागिन्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. हे दागिने खरेदी करण्यासाठी महिलांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या वेळी हे दागिने गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वस्त आहेत. गेल्या वर्षी हलव्याचे दागिने शंभर ते 650 रुपयांपर्यंत होते. या वेळी ते शंभर ते 450 रुपयांपर्यंत आहेत. नोटाबंदीमुळे दागिने बनवण्याचे साहित्य स्वस्त झाल्यामुळे दागिनेही स्वस्त झाले आहेत.

पूर्वी संक्रांतीला महिला घरीच असे दागिने तयार करत. परंतु काही वर्षांपासून बाजारात मिळणारे तयार दागिने त्या वापरतात. हा सण नववधूसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. महिला काळ्या साड्या नेसतात. त्यावर सुंदर हलव्याचे दागिने घातले जातात. बाजूबंध, कपाळावरची बिंदी, मुकुट, हार, कानातले, मंगळसूत्र, नथ, पैंजण, लफ्टा, चिंचपेटी, तन्मणी, वाकी, मेखल्या आदी दागिने बाजारात आहेत. शंभर रुपयांपासून हे दागिने मिळतात. हलव्याच्या दागिन्यांसाठी महिलांचा कल बाजारपेठेकडे वळू लागला आहे.
हिवाळ्यात धनधान्यांच्या सुगीचा हंगाम असतो. हलव्याचे दागिने तीळ व साखरेच्या पाकात बनवले जातात. हे दागिने सोन्याच्या दागिन्यांसारखेही तयार केले जातात.

पूर्वी हे दागिने घरीच तयार केले जात. त्यामुळे बाजारात त्याचे दर जास्त होते. आता यंत्रावर ते तयार केले जात असल्यामुळे त्यांचे दर कमी झाले आहेत. नोटाबंदीमुळे तीळ स्वस्त झाल्याने हे दागिनेही स्वस्त झाले आहेत.
- भारती वादवाने, विक्रेता.

Web Title: note ban makar sankranti