'महिला व बालकल्याण'ला खंडपीठाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - महिला व बालकल्याण आयुक्त पुणे यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या बालगृहांना अधिनियम 2015 च्या तरतुदीनुसार नव्याने अटी, शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी काढलेले परिपत्रक जाचक असून, त्यास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली. लातूर व बीड जिल्ह्यांतील बालगृहचालकांतर्फे दाखल याचिकावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस. के. कोतवाल यांनी महिला व बालकल्याण आयुक्तांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी 18 जूनला ठेवण्यात आली आहे.
Web Title: notive to Women and child welfare by court