आता वीजबिल भरा एकरकमी आणि मिळवा 'इतकी' सवलत; वाचा तुमच्या फायद्याची बातमी..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

 तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीजबिलात दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे.

मुंबई :  तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीजबिलात दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे तीन सामान हप्ते करून देण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी घोषित केले.

वाढीव वीजबिलाच्या तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, वीज नियामक आयोगाने कोरोना महामारीच्या अनुषंगाने सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची प्रत्यक्ष जागेवर जावून मीटरवाचन व वीजबिल वितरण न करण्यास महावितरणला आदेश दिले होते. 

हेही वाचा: अरे वाह! पालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना पुन्हा 'ताज' चे जेवण; 1 जुलैपासून होणार सुरुवात 

तसेच लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणने मिटर रीडींग व देयक वाटपाचे काम बंद ठेवल्याने एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराची देयके आकारण्यात आलेली आहेत. 1 जून 2020 पासून सरकारतर्फे प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. 

त्यानुषंगाने महावितरणने ग्राहकांना मिटर रीडींगनुसार वीजदेयक देण्यासाठी 1 जून पासून प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी मिटर रीडींग, वीजदेयके वाटप तसेच वीजदेयक संकलन केंद्रे पुन्हा सुरु केलेली आहेत.

जूनमध्ये देयकाची रक्कम जास्त दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात आलेली सरासरी देयके ही हिवाळयातील वीज वापरावर दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला घरगुती ग्राहकांच्या विजेच्या वापरात वर्क फ्रॉम होम व उन्हाळयामुळे मागच्या वर्षीपेक्षा वाढ झालेली आहे. जी जूनच्या बिलात दिसून येते आहे. जूनचे बिल कसे योग्य आहे हे ग्राहकांना समजावून सांगण्यासाठी तसेच ग्राहकांच्या बिलांचे तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता,अधिक्षक अभियंता यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 हेही वाचा:बापरे! कोरोनाच्या औषधाबाबत मुंबईत घडला धक्कादायक प्रकार; तब्बल ५ दिवस..​
 

घरगुती ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची पद्धत:

- घरगुती ग्राहकांसाठी 3 हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत.
- महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना कोणतीही गरज नाही.
- कुठल्याही वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन कमीतकमी वीजबिलाच्या 1/3 रक्कम भरता येईल.
- संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास २ टक्क्यांची वीजबिलामध्येसूट देण्यात येईल.
- ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेच्या वीजबिल भरले असल्यास, त्यांना देखील ती सूट त्यांच्या वीजबिलामध्ये देण्यात येईल.
- जे घरगुती ग्राहक लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी गेल्यामुळे त्यांचा वीजवापर हा अगदी कमी झाला आहे. तरी त्यांना मीटर रीडिंग न घेतल्यामुळे मागील वीजवापरानुसार सरासरी वीजबिल देण्यात आले आहे. अशा ग्राहकांच्या वीजमीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन, त्यांचे वीजबिल दुरूस्त करण्यात येतील.

now 2 percent discount on electricity bill read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now 2 percent discount on electricity bill read full story