
मुंबई : शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तलावांमध्ये साचला असून, पाण्याचा तुटवडा भासणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सध्या तब्बल १२,९०,८१७ एमएलडी (८९.१८ टक्के) पाणीसाठा आहे. एकूण क्षमता १४,४७,३६३ एमएलडी असलेल्या तलावा परिसरामध्ये अद्याप पावसाळा सुरूच आहे. त्यामुळे हा साठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.