Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये तब्बल ९५.७४ टक्के पाणीसाठा जमा झाला असून पाणीकपातीची गरज नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मुंबई : संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाणीचिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये तब्बल ९५.७४ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, पाणीकपातीची गरज नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.