आता शाळेतदेखील बायोमेट्रिक हजेरी!

File Photo
File Photo

मुंबई : राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सुरुवातीच्या काळात औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांकरिता हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत या जिल्ह्यांतील शाळांना विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घ्यावी लागणार आहे.

राज्यातील अनेक अनुदानित शाळांनी विद्यार्थ्यांची चुकीची पटसंख्या दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती हे तपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानुसार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार पालघर, औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील शासकीय व अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने शाळांची यादीही जाहीर केली आहे. 

शाळांवर आर्थिक भुर्दंड

शाळांना ही बायोमेट्रिक हजेरीची पद्धत राबवण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देण्यात येणार नसून शाळांना आपल्या पैशानेच हा उपक्रम राबवावा लागणार आहे. तीन महिने विद्यार्थ्यांची हजेरी घेतल्यानंतर शाळांना याची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करावी लागणार आहे. या उपक्रमासाठी शाळांना विद्युतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे; तर बायोमेट्रिक मशीनव्यतिरिक्त इतर डिजिटल उपकरणाच्या आधारेदेखील विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com