मुंबईतल्या 'या' गोष्टींवर आता आहे ड्रोनची नजर. वाचा आणि जाणून घ्या कारण..  

drone
drone

मुंबई:  बहुतांश वेळी पोलिस दलात, सैन्यात, लग्न समारंभात किंवा कुठल्या कार्यक्रमात ड्रोन वापरला जातो. हा ड्रोन तुम्ही बघितलाही असेल. मात्र आता बीएमसीकडून एका खास कामासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ड्रोनची नजर कुठल्या भव्य वास्तूवर किंवा कुठल्या बड्या व्यक्तीवर नाही तर चक्क नदी आणि नाले यांच्यावर आहे.

शहरात सुरु असलेल्या नाले सफाईवर ड्रोनची नजर ठेवण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या उगमा पासून शेवटपर्यंंत सफाईच्या कामावर चोख लक्ष ठेवले जात आहे. मुंबईत पावसाळ्यापुर्वी दरवर्षी नाले सफाई केली जाते.या नाले सफाईत 5 वर्षांपुर्वी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यानंतर गैर प्रकार रोखण्यासाठी सफाईचे छायाचित्र, व्हिडीओ काढण्यासही सुरुवात झाली होती.त्यापुढे जाऊन महापालिका आता ड्रोनने नाले सफाईवर नजर ठेवत आहे यामुळे ज्या ठिकाणी अपेक्षित नाले सफाई झाली नाही त्या ठिकाणी तत्काळ पुन्हा तपासणी करुन घेतली जाते. 

29 मे पर्यंत पालिका अशा प्रकारे नाले सफाईवर ड्रोनने नजर ठेवणार आहे.अशी माहिती पर्जन्य जलवाहीन्या विभागा मार्फत देण्यात आली. या सर्व व्हीडीओ ग्राफिचा अभ्यास करुन कोणत्या ठिकाणी नाल्यात गाळ जास्त आहे कचरा जास्त आहे.त्याचाही अंदाज येईल त्यानुसार पुढील नियोजनही करता येणार आहे.

मुंबईच्या नाल्यातील 70 टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.मुंबईत 215 किलो मिटरचे मोठे 156 किलो मिटरचे लहान नाले आहेत.तर साधारण 1 हजार 986 किलोो मिटरचे नाले आहेत.31 मे पर्यंत नाले सफाई पुर्ण करायची आहेत.तर जास्तीत 5 ते 7 जून पर्यंतची मुदत वाढ मिळू शकते.

now BMC keep eyes with help of drones on rivers in mumbai read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com