
मुंबई: मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल २१ हजारांच्या पार पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर बघायला मिळतो आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा शिरकाव ही पावसाळ्यात प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू शकते म्हणूनच BMC नं दाट लोकवस्तीत कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील एका रुग्णामागे किमान दहा व्यक्तींना क्वारंटाईन केले जाणार आहे. या सर्वांना किमान १४ दिवसांसाठी विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. असे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत. झोपडपट्ट्यांमधली साथ अटोक्यात आणण्यासाठी हा नवा प्रयोग करण्यात येणार आहे.
मुंबईत चौथ्या टप्प्यातला लॉकडाऊन सुरु झाला आहे. पावसाळ्यापुर्वी रुग्ण वाढीच्या वेगावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत रुग्ण दुप्पट होण्याचा वेग २० दिवसांवर आणण्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र पावसाळ्यातले साथीचे आजार तसंच काही प्रमाणात व्यवसाय सुरु करण्याची गरज लक्षात घेऊन हा कालावधी अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
यापुर्वी एका रुग्णा मागे किमान ३ व्यक्तीना विलगीकरण केंद्रात पाठवलं जात होतं. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे प्रमाण ६ व्यक्तींपर्यंत आलं. परीस्थीतीनुसार ही संख्या कमी अथवा वाढवली जात होती. मात्र आता झोपडपट्ट्यांमध्ये एक रुग्ण आढळला तरी त्या मागे हाय रीस्क आणि लो रिस्क अशा किमान दहा व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. असे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
झोपडपट्ट्यांमधल्या हाय रीस्क व्यक्तींना सध्या पालिकेच्या विलगीकरण केंद्रात १४ दिवसांसाठी ठेवलं जात आहे. आतापर्यंत ३५ हजार २६३ व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं होतं. धारावी ट्रान्झिट स्कुलमध्ये आतापर्यंत ४ हजारहून अधिक व्यक्तीना ठेवण्यात आलं होतं. ही संपुर्ण शहरातली सर्वाधिक संख्या आहे. तर धारावीतच मनोहर जोशी शाळेत १ हजार ८२९ व्यक्तींना ठेवण्यात आलं होतं. तसंच धारावीसाठी इतरही केंद्र सुरु आहेत. कोरोनाची साथ पसरु नये म्हणून सामाजिक अंतर पाळणं गरजेचं आहे. मात्र झोपडपट्टांमध्येही असं अंतर पाळणं शक्यच नाही. त्यामुळे पालिकेनं हा निर्णय घेतला आहे.
विलगीकरण केंद्रांची परिस्थिती:
खाटा - ३१ हजार ००३
आता पर्यंत दाखल झालेल्या व्यक्ती - ३५ हजार २६३
विलगीकरण कालावधी संपला - २२ हजार ४९०
सध्या केंद्रात असलेल्या वक्ती - १४ हजार ३८३
धारावीसह या प्रभागातल्या झोपड्यांपट्ट्यांमध्ये हाय अलर्ट:
एफ उत्तर - (दादर माटूंगा पुर्व,शिव,वडाळा)
एम पुर्व - गोवंडी मानखुर्द
एम पुर्व - चेंबूर
एच पुर्व - वांद्रे,सांताक्रुझ,खार पुर्व
के पश्चिम - विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्वरी पुर्व
now BMC will quarantine 10 people if one patient found positive read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.