आता तळीरामांना घरीही पोहचवावे लागणार

किशोर कोकणे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

ठाणे - रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी तळीरामांना घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था बार मालकांनी करण्याचा निर्णय ठाणे जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. या निर्णयानुसार मद्यपान केल्यानंतर पूर्णपणे नशेत असणाऱ्या व्यक्तींना त्याच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी बार मालकांना चालक उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. तळीरामांना त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था बार मालकांच्या माथी मारण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांची धाकधूक वाढली आहे. 

रस्ते अपघातात सर्वात जास्त बळी जात असल्याने काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने सर्व शहरांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्‍वभूमीवर ठाण्यात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समिती गठीत करण्यात आली आहे. नुकतीच या समितीची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मद्यपान करून गाडी चालविणाऱ्यांमुळे अनेकदा अपघात होतात हे जाणून घेत महामार्गालगत असलेल्या बार आणि हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या ग्राहकांना इच्छीत स्थळी सुखरूप पोहोचविण्यासाठी वाहनासह चालक किंवा चालकाची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना कराव्या, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना ज्या ठिकाणी व्यवस्थापक बसतो. त्या ठिकाणी "चालक उपलब्ध आहे' असा बोर्ड लावावा लागणार आहे. 

जिल्हा रस्ते सुरक्षा समितीमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी चालक उपलब्ध करून द्यावा, असा विषय पुढे आला होता. कोणत्या हॉटेल्सला सूचना पाठवाव्यात, याची माहिती आम्ही घेत आहोत. त्यानुसार लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. 
रुपाली अंबुरे, अधीक्षक, महामार्ग पोलिस, ठाणे. 

Web Title: now Drinker have to reach home