एक प्रश्न सुटला ! खमंग, तोंडाला पाणी आणणारा सर्वांचा आवडता वडापाव आता असा मिळणार...

wadapav
wadapav

मुंबई: देशात सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे देशाला कुलूप लागल्याचं चित्र दिसून येतंय. तसंच या लॉकडाऊनमुळे बाहेर जाऊन खवय्येगिरी करणाऱ्या खवय्यांच्या तोंडालाही कुलूप लागलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर हमखास मिळणारे आणि प्रसिद्ध असणारे काही पदार्थ सध्या गायब झाले आहेत. त्यामुळे शेकडो लोकं लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत. मात्र आता खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

मुंबईकरांचा आवडता आणि चालता-बोलता कुठेही खाता येणारा प्रसिद्ध वडापाव आता ऑनलाईन ऑर्डर करता येणार आहे. वडापाव म्हटलं की सेलिब्रिटी असो वा सामान्य नागरिक सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं सध्या लॉकडाऊन मुळे वडापावची दुकानं  बंद असल्यामुळे खवय्यांचा हिरमोड झाला होता. मात्र आता मुंबईत इतर गोष्टींसारखा चक्क वडापावही घरपोच मिळणार आहे. त्यामुळे खवय्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

 लॉकडाऊनमुळे मराठी उद्योजक ही काळानुसार बदलून व्यवसाय करत आहेत. त्यात त्यांना व्यवसाय करण्याच्या नवनवीन कल्पना सुचत आहेत. अशाच एका मराठमोळ्या वडापाव विकणाऱ्या व्यक्तीनं आता वडापाव थेट ऑनलाईन विकण्याचा निर्णय घेतला आहे.  

डोंबिवलीतल्या पाटकर शाळेजवळचा सुप्रसिद्ध असलेला साईबाबा वडापाव आता लोकांना घरपोच खायला मिळणार आहे. या वडापावची चव घेतली नाही असा डोंबिवलीकर सापडणार नाही. काही दिवसांपूर्वी वडापावप्रेमींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून  वडापावची चव चाखायला मिळत नसल्याने खंत व्यक्त केली होती. मात्र आता हा गरमागरम वडापाव डोंबिवलीकरांच्या दारात टकटक करायला सज्ज झाला आहे. वडापावच्या एका नगाची किंमत १५ रुपये इतकी असणार आहे. 

या वडापाव सेंटरचेव मालक मराठमोळे आहेत. त्यांनी सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना मदतीसाठी ट्रक भर सामान घेऊन जात असताना साईबाबा वडापाव सेंटरकडून पूरग्रस्तांना मदत म्हणून भरपूर अन्न धान्य,खाद्य  पदार्थ यांची मदत केली होती. त्यामुळे आता साईबाबा वडापावसारखंच मराठी व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी माणसानं पुढे यायला पाहिजे असं मत मनविसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे  यांनी म्हंटलंय. 

now mumbai people can order wadapav online read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com