यंदा बाप्पाची मिळणार थेट घरपोच डिलिव्हरी; शेणखत-लालमातीच्या गणेश मूर्तींना भाविकांकडून प्रचंड मागणी 

go green bappa
go green bappa

मुंबई: कोरोना विषाणूंमुळे येऊ घातलेल्या गणेशोत्सवावर परिणाम होऊ शकतो. भाविकांना गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी त्याचे विसर्जन कसे होणार याची चिंता लागली आहे. कोरोनामुळे बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे गणेश भाविकांसाठी 'गाो ग्रीन बाप्पा' चे पंकज कुंभार यांनी गणेश मूर्ती थेट घरपोच देण्याची सुविधा केली आहे.

 या मूर्ती पर्यावरणस्नेही असल्याने त्यांचे घरच्या घरी विसर्जन करणे सहज शक्य आहे. त्यामुळे भाविकांना गणेश मूर्ती आणण्यासाठी व विसर्जनासाठी बाहेर पडण्याची गरज नाही. शेणखत, कागदाचा लगदा, शाडू माती, लाल माती यांच्या मिश्रणातून गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार केल्या जातात. 

गेली काही वर्षांपासून पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल आहे. तसेत राज्य सरकार पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यसाठी जनजागृती केली आहे. याच विचारातून पंकज यांच्या पत्नी सोनारी कुंभार यांनी 'गो ग्रीन बाप्पा' संकल्पना प्रत्यक्षात आणली. पंकज कुंभार मूळचे कराडचे. त्यांच्या गावी फार पूर्वीपासून मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. पंकज यांचे कुटूंब परंपरेने कुंभार आहेत. पंकज यांचे भाऊ शुभम कुंभार गावी मातीच्या मूर्ती तयार करतात. त्यानंतर त्या गणेशोत्सव आधी त्या मूर्ती मुंबईला आणल्या जातात. अंतिम फिनिशिंग करून ऑर्डर प्रमाणे मूर्तींचे पॅकिंग केले जाते आणि भाविकांना घरपोच गणपतीची डिलिव्हरी केली करण्यात येते, असे पंकज यांनी सांगितले. 

 या वर्षी आतापर्यंत 50 मूर्तींची ऑर्डर आली आहे. भाविकांकडून मूर्ती ऑर्डरसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. परंतु या वर्षी 100 ते 125 मूर्ती बनवणे शक्य आहे. मर्यादितच ऑर्डर घेत आहोत. लॉकडाऊन कच्चा माल मिळणे कठिण झाले होते. एका मूर्ती तयार करण्यासाठी एक दिवस जातो. शुभम एकटेच मूर्ती तयार करतात. 10 इंचापासून ते 18 इंचापर्यंत गणेश मूर्ती तयार केल्या जातात, असे पंकज यांनी माहिती दिली. 

 ही मूर्ती पर्यावरणस्नेही आणखी एका कारणाने आहे ते म्हणजे या मूर्ती सोबत पंकज बेलाचे किंवा जास्वंदाचे कलम देतात. मातीची मूर्ती घरच्या घरी टपामध्ये विसर्जित करून खाली मातीचा गाळ राहिलेला असतो. तो गाळून कुंडीमध्ये सोबत दिलेले कलम लावता येते. प्रत्येक मूर्ती मागे एक नव्या रोपटाची निर्मिती दरवर्षी होते. 

भाविकही मनोभावाने पूजन केलेल्या मूर्तीचे विसर्जन करून त्याची आठवण म्हणून ते रोपट्याची तेवढीच निगा राखतात. भाविक त्या रोपट्याचे फोटो आम्हाला पाठवतात. अशा दृष्टीने पर्यावरणाचे संवर्धन करण्यास या मूर्तीच्या माध्यमातून हातभार लागत आहे, याचे खूप समाधान आम्हाला मिळते, अशा भावना पंकज यांनी व्यक्त केल्या. मूर्तीची ऑर्डर व मूर्ती पाहण्यासाठी www.gogreenbappa.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

now online delivery of  ganesh idols will available on go green bappa  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com