esakal | दर्जेदार प्लाझ्मा निवडण्यासाठी पालिकेने आणले 'हे' तंत्रज्ञान; प्लाझ्मातील अॅंटीबॉडीजचे प्रमाणही समजणार....
sakal

बोलून बातमी शोधा

plazma testing

कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या प्लाझ्मादात्यांच्या प्लाझ्मातील प्रतिद्रव्यांची पातळी ( अँटीबॉडीज लेव्हल) ओळखण्यासाठी महापालिकेकडून नवीन तंत्रद्यान आणले गेले असून केमिलोमिनेसेंट इम्युनोसे या पध्दतीने कोविडवर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा आणि प्रतिद्रव्यांची अँटीबॉडीजचे प्रमाण ठरवता येईल.

दर्जेदार प्लाझ्मा निवडण्यासाठी पालिकेने आणले 'हे' तंत्रज्ञान; प्लाझ्मातील अॅंटीबॉडीजचे प्रमाणही समजणार....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या प्लाझ्मादात्यांच्या प्लाझ्मातील प्रतिद्रव्यांची पातळी ( अँटीबॉडीज लेव्हल) ओळखण्यासाठी महापालिकेकडून नवीन तंत्रद्यान आणले गेले असून केमिलोमिनेसेंट इम्युनोसे या पध्दतीने कोविडवर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा आणि प्रतिद्रव्यांची अँटीबॉडीजचे प्रमाण ठरवता येईल. त्यामुळे, पुरेशा प्रमाणात प्रतिद्रव्य असलेले प्लाझ्मा कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येईल.

वाचा ः राज्यातील 'या' 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्याचे न्यायालयाचे सरकारला आदेश...

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर) यांनी महापालिकेचे केईएम रुग्णालय, नायर आणि कस्तुरबा रुग्णालय यांना प्लाझ्मा उपचार पद्धतीची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. या अनुषंगाने कोरोनाबाधितांना प्लाझ्मा देताना त्यामध्ये योग्य पातळीचा प्लाझ्मा आणि त्यासोबत पुरेशा पातळीने प्रतिद्र्व्य ( अँटीबॉडीज ) उपलब्ध असल्याचे तपासून पाहणारी नवीन पद्धती कस्तुरबा रुग्णालयाच्या सूक्ष्मजीव वैद्यकीय प्रयोगशाळेने उपलब्ध करून दिली आहे. 

वाचा ः जडेजा, पुजारासह पाच क्रिकेटपटूंना उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची नोटीस; काय झालंय नेमकं?​

'केमिलोमिनेसेंट इम्युनोसे' असे या पद्धतीचे नाव असून या पद्धतीचा उपयोग करुन जी व्यक्ती कोरोना आजारातून बरी झाली आहे. त्याच्या शरीरातील प्लाझ्मा तपासून अँटीबॉडीजची पातळी तपासण्यास मदत होते. कोरोना आजारांवर उपचार घेत असताना व्यक्तीनुसार वेगवेगळ्या संख्येने अँटीबॉडीज तयार होत असतात. अशा स्थितीत नेमक्या किती अँटीबॉडीज असाव्यात, याबाबत निश्चिती करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो.  त्यामुळे ज्या प्लाझ्मा दात्याच्या प्लाझ्मामध्ये पुरेशा संख्येने अँटीबॉडीज आहेत त्याची निवड करण्यात येते. त्यामुळे रुग्णाला गुणवत्तापूर्ण प्लाझ्मा देऊन अधिक परिणामकारक उपचार करण्यास मदत होईल. 

वाचा ः आम्हीही नाही जाणार शाळेला; विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांचाही नकार...

आतापर्यंत नायर रुग्णालयाने 31 प्लाझ्मा नमुने संकलित केले असून केईएम रुग्णालयानेही रुग्णांकडून प्लाझ्मा संकलित करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत नायर रुग्णालयातील 6 रुग्णांवर आणि कस्तुरबा रुग्णालयातील 7 लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहेत. लवकरच ही उपचार पद्धती  महापालिकेच्या 3 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही सुरु केली जाणार आहे.

वाचा ः मुंबईत आता अंत्यसंस्काराची वेळ मिळणार ऑनलाईन, जाणून घ्या काय आहे सर्व प्रकार...

केमिलोमिनेसेंट इम्युनोसे पद्धतीने अँटीबॉडीजची पातळी किती आहे हे जाणू शकतो. काही काही रुग्णांमध्ये अँटीबॉडीजची पातळी कमी जाणवते. ज्यामुळे प्लाझ्मा थेरेपीसाठी वापरु शकत नाही. त्यामुळे या पद्धतीने प्लाझ्मातील अँटीबॉडीजची पातळी आपल्याला कळेल. चांगल्या दर्जाचा प्लाझ्मा देण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरेल. 
- डॉ. दक्षा शाह, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, मनपा